शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क
शिरोळ मधील विजेता स्पोर्ट्स तर्फे दरवर्षी निरनिराळे सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. टेनिस क्रिकेट चे आयोजन देखील यांचेकडून दरवर्षी चांगल्या पद्धतीने केले जाते.
यावर्षी विजेता स्पोर्ट्स कडून गणेशोत्सवा निमित्त चुडमुंगे मळा,शिरोळ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीर हे श्री.गणेशाय आरोग्य अभियान अंतर्गत शिरोळ ग्रामीण रुग्णालय तज्ञ डॉक्टर्स यांचे मार्फत व विजेता स्पोर्ट्स च्या आयोजनाने घेण्यात आले होते. सदर शिबीर शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 2 यावेळेत आयोजित करण्यात आले होते.
या आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरास परिसरातील 55 रुग्णांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेश जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ.राजश्री मगदूम, डॉ.देवेंद्र कोरवी, आरोग्य कर्मचारी, विजेता स्पोर्ट्स चे कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा