शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क
सर्वसामान्यांचा आधारवड असलेल्या आंदोलन अंकुश संघटनेच्या दिव्यांग संस्थेच्या टीमने पाठपुरावा करून, दिव्यांगांना अंत्योदय रेशन कार्ड मिळण्यासाठी प्रयत्न करून, आवश्यक ती कागदपत्रे शासनाला पुरवून दिव्यांगांना अंत्योदय रेशन कार्ड मिळवून दिली आहेत. शिरोळ तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना गेल्या अनेक वर्षांपासून अंत्योदय कार्डपासून पासून वंचित रहावे लागले होते. आज सोमवार दिनांक 12 जानेवारी रोजी आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्या मार्फत दिव्यांगांना अंत्योदय कार्डाचे वाटप करण्यात आले. यावेळी शिरोळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा योगिता कांबळे, नगरसेवक अमरसिंह शिंदे व जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा नीता माने या उपस्थित होत्या.
शिरोळ येथील महसूल भवन येथे आज दिनांक 12 जानेवारी रोजी शिरोळ तालुका अंकुश दिव्यांग संस्थेचा पहिला मेळावा पार पडला. या वेळी आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे बोलताना म्हणाले की, शिरोळ तालुक्यातील दिव्यांगांचे प्रलंबित सर्व प्रश्न सोडवण्यासाठी अंकुश दिव्यांग सहाय्य संस्थेची स्थापना केली असून, गरजू दिव्यांगाना त्यांचे हक्क मिळवून देणे तसेच त्यांना समाजात ताठ मानेने जगता यावे, स्वयंरोजगार निर्माण करणे हा उद्देश ठेऊन अंकुश दिव्यांग सहाय्य संस्था काम करत आहे. या संस्थेकडून गेल्या दीड वर्षात अनेक उपक्रम राबवून दिव्यांगाना मदत मिळवून द्यायचे काम झाले आहे.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून आलेल्या नीता माने म्हणाल्या की, दिव्यांगाना मदत करणे म्हणजे पुण्याचे काम असून, माझ्या कडून लागेल ती मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास नवनियुक्त नगराध्यक्षा योगिता कांबळे यांनी पुष्पहार घातला. यावेळी कृष्णा देशमुख,भगवान कोळी सर, अमर शिंदे यांची भाषणे झाली.
यावेळी राजू गावडे, विनायक उर्फ गट्टू चुडमुंगे, किसन काळे, सय्यद पिरजादे, प्रदीप आयगोळे, कुबेर पाटील, सुधाकर तावदारे, संजय पाटील, बंडा परीट, सुनीता पाटील, राणी गवळी, अनिता कुरणे, दीपाली मुंगळे, राहुल गंगधर, मोहन गावडे, योगेश खाडे, वैशाली माने यांच्या बरोबर शिरोळ तालुक्यातील दिव्यांग बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा