शिरोळ मधील गायरान भूखंड घोटाळा प्रकरणी चौकशी समितीची नेमणूक... तहसीलदारांच्या आश्वासनानंतर सामाजिक कार्यकर्त्यांचे उपोषण मागे...





शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क 


शिरोळ येथील गट नंबर 899 मधील भूखंड शासनाने किरकोळ स्वरूपात मोबदला घेऊन अटी व शर्तीवर बेघर लोकांना वाटप केलेले आहेत. सदर जमिनी मधील भूखंड वाटप करताना प्रचंड आर्थिक घोटाळा झालेला असून,सदर भूखंडाची व त्यावरील बांधकामाची चौकशी करणे व सदरचे भूखंड शासन ताब्यात घ्यावे या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयासमोर दिनांक 11 सप्टेंबर पासून सामाजिक कार्यकर्ते मंगेश नलावडे व राजू आवळे यांनी उपोषण चालू केले होते. 



सदर भूखंडाचे लेआउट करण्याची जबाबदारी देण्यात आलेले शिरोळ मधील इंजिनियर श्रीकांत शंकर माळी व येथील भांडवलदार सुरेश महादेव खडके यांनी संगणमत करून अनेक प्लॉट हडप केलेले आहेत. काही प्लॉट वर इमारती बांधून भाड्याने दिलेल्या आहेत. ते सर्व शासनाने ताब्यात घ्यावेत. असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे होते.


                                                   भर पावसात आंदोलन 

 

चौकशी समितीची नेमणूक : 


या मागणीच्या अनुषंगाने आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी उपोषण स्थळी भेट दिली. उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन उपोषणकर्त्यांच्या मागणीप्रमाणे येथील भूखंड क्रमांक 4/1,4/2,6/1,6/2,9/1 व 13/2 या भूखंडाची चौकशी करणे कामी, तहसीलदारांनी एक समिती नेमली आहे. यामध्ये नायब तहसीलदार श्री. विलास भिसे,  शिरढोणचे मंडळ अधिकारी श्री.मच्छिंद्रनाथ कुंभार, नांदणीचे मंडळ अधिकारी श्री. संतोष पाटील, शिरोळचे तलाठी श्री. संभाजी घाटगे, व जांभळीचे तलाठी श्री. अनंत दांडेकर  यांची नेमणूक करण्याचा आदेश तहसीलदारांनी दिला आहे. 


आदेशात म्हटले आहे की, उपरोक्त समितीतील सदस्यांनी दिनांक 15/9/2025 पासून तक्रारी मध्ये नमूद करण्यात आलेले भूखंड तक्रारदारासह समक्ष स्थळ पाहणी करून, सदर भूखंडाबाबतचा पंचनामा, भूखंड खुले आहे अगर बांधकाम आहे..?, भूखंड कोणाच्या ताब्यात आहे..? भूखंडावर बांधकाम असल्यास, त्यामध्ये स्वतः भूखंड धारक राहतात किंवा कसे..? भूखंडाचे खरेदी विक्री झालेली आहे का..?  भूखंडधारक, तक्रारदार भाड्याने राहत असतील त्या भाडेकरूंचे जबाबासह आदेशातील व कबुलायती मधील सर्व अटींची पडताळणी करून, कोणत्या अटींचा भंग केलेला आहे त्याबाबतचा सविस्तर अहवाल 4 दिवसात या कार्यालयाकडे पाठवावा.


या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे व चौकशी समितीने अहवालात काही फेरफार केल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.


यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, शिरोळ मधील गणेश चौक मित्र मंडळाचे कार्यकर्ते व प्लॉट बाबत फसवणूक झालेले अनेक नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने