न्यू सनी गणेशोत्सव मंडळ, दत्तवाडच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त उद्या सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे प्रेरणादायी व्याख्यान...



दत्तवाड प्रतिनिधी : अचिन हेरवाडे ( लगाम न्यूज नेटवर्क )


दत्तवाड येथील दत्तवाडचा महाराजा न्यू सनी गणेशोत्सव मंडळच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सुप्रसिद्ध युवा व्याख्याते वसंत हंकारे यांचे "मुलं-मुली आणि आई-वडील यांच्या नात्यातील ओलावा समजून घेण्यासाठी" या विषयावर काळजाला भिडणारे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित केले आहे.



"न समजलेले देव माणसं म्हणजे आई-वडील" या विषयावर होणारे हे व्याख्यान उद्या रविवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी  ७ वाजता गांधी चौक, दत्तवाड येथे होणार आहे. हंकारे यांच्या व्याख्यानात आई-वडील आणि मुलं-मुली यांच्यातील नात्याची गोडी, त्यातील विसंगती आणि ती कशी दुरुस्त करता येईल, यावर मार्गदर्शन केले जाईल.



या कार्यक्रमाला न्यू सनी गणेशोत्सव मंडळ चे पदाधिकारी आणि गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. हंकारे यांच्या शब्दांतून उपस्थितांना प्रेरणा मिळणार आहे आणि हा कार्यक्रम प्रत्येकासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास मंडळाने व्यक्त केला आहे. तरी दतवाड व परिसरातील लोकांनी उपस्थित राहून कार्यक्रम ला शोभा आणावी असे आवाहन करण्यात आलेले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने