वृक्षतोड करणार्‍या अज्ञात व्यक्तीवर शिरोळ पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल : आंदोलन अंकुश चे महेश जाधव यांचा गेले 7 महीने पाठपुरावा

  





शिरोळ प्रतिनिधी : मंगेश नलावडे



शिरोळ मधील श्री.दत्त साखर कारखाना आवारातील अशोका जातीची 10 झाडे दत्त साखर कारखाना प्रशासनाने तोडली असल्याबाबत, आंदोलन अंकुश संघटनेचे श्री.महेश जाधव यांनी 18 डिसेंबर 2024 रोजी शिरोळ नगरषदेकडे तक्रार अर्ज केलेला होता. या तक्रार अर्जात त्यांनी महाराष्ट्र झाडे तोडणे नियमन व अधिनियम 1964 ( सुधारणा 6 सप्टेंबर 2024 ) नुसार  श्री.दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना प्रशासनावर तात्काळ कडक कारवाई करणेबाबत मागणी केलेली होती. 



यानंतर सलग 7 महीने त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलिस स्टेशन यांना वारंवार पत्रव्यवहार केले. लोकशाही दिनात जिल्हाधिकारीसो,कोल्हापूर यांची 2 वेळेस भेट घेतली. जिल्हाधिकारीसो, कोल्हापूर यांनी याची दखल घेऊन, शिरोळ नगरपरिषदेला फिर्याद दाखल करण्याचे आदेश केले होते. त्यानुसार काल मंगळवार दिनांक 08 जुलै 2025 रोजी शिरोळ नगरपरीषदेचे अधिकारी श्री.श्रीधर चंद्रकांत डुबले यांनी शिरोळ पोलिस स्टेशन मध्ये अनोळखी व्यक्तीविरोधात फिर्याद दिली आहे. 



श्री.डुबले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिरोळ पोलिस स्टेशन मध्ये अशोका जातीची 10 झाडे ( प्रत्येकी किंमत अंदाजे 1000 रुपये प्रमाणे 10000 रुपये ) तोडलेबाबत अनोळखी व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) व महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम,1975 कलम 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 




आंदोलन अंकुश चे पदाधिकारी व शिरोळ मधील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते श्री.महेश जाधव यांनी श्री.दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने अंतर्गत रस्ता करण्यासाठी सदर झाडे विनापरवाना तोडली असल्याचा आरोप केला आहे व कारखान्याची आर्थिक, राजकीय ताकद जरी मोठी असली, तरी कारवाई झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. असा ईशारा दिला आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने