जागतिक बँकेच्या निधीतून शिरोळ तालुक्याला 500 कोटींची तरतूद करा : धनाजी चुडमुंगे





प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क 



जागतिक बँकेने महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यातील पूर नियंत्रणासाठी 3200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातील निधी शिरोळ तालुक्याला किती...? या विषयासाठी, सोमवार दिनांक 9 जून रोजी आंदोलन अंकुश संघटनेकडून  कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज शुक्रवार दिनांक 20 जून रोजी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.



जागतिक बँकेच्या 3200 कोटीतून शिरोळ तालुक्यातील महापुरावर उपाय योजना करण्यासाठी 500 कोटींची तरतूद करण्याची मागणी आज झालेल्या बैठकीत आंदोलन अंकुश च्या वतीने करण्यात आली.



त्यामध्ये, धनाजी चुडमुंगे यांनी नदी पात्रातील अडथळे, पुलाचे भराव व कर्नाटक हद्दीतील भराव काढण्यासाठी प्राधान्याने कामे करण्याची गरज असून, ही कामे जागतिक बँकेने दिलेल्या पैशातून करावीत अशी भूमिका मांडली. 







या बैठकीला पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापुरास कोणते घटक कारणीभूत आहेत याचा अभ्यास पूर्ण झाला असून, लवकरच कामे निश्चित केली जातील. असे कार्यकारी अभियंता माने मॅडम यांनी सांगितले.  आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. संकपाळ हे सुद्धा सदर बैठकीला उपस्थित होते. 



या बैठकीला आंदोलन अंकुश चे जिल्हाध्यक्ष दिपक पाटील, तालुकाध्यक्ष नागेश काळे, रशीद मुल्ला, नानासाहेब चव्हाण, आनंदा भातमारे उपस्थित होते.




हिप्परगी ब्यारेज चे गेट खाली टाकलेले असतात, त्यावेळी शिरोळ तालुक्यात पाणी पातळी वाढते. याकडे दिपक पाटील यांनी लक्ष वेधून हिप्परगी चे गेट 15 सप्टेंबर पर्यंत खाली येणार नाहीत. याची जिल्हाधिकारी यांनी दक्षता घ्यावी. अशी सूचना केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने