प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क
शिरोळ खून प्रकरणावरून आंदोलन अंकुश संघटनेने आज जिल्हा पोलिस प्रमुख, कोल्हापूर यांना निवेदन दिले आहे. जुन्या वादातून शिरोळ मध्ये तरुणाचा खून असे सांगून, शिरोळ पोलिस " ताकाला जाऊन मोगा लपवण्याचा प्रयत्न करीत आहेत", असा आरोप आंदोलन अंकुश चे धनाजी चुडमुंगे यांनी केला आहे. सदर निवेदनात म्हंटले आहे की,
शिरोळ मध्ये रविवारी रात्री 7 तरुणांनी एका तरुणाची हत्या केल्याची घडना घडली आहे. गावातील गांजा विक्री आणि सेवन करणार्यांची माहिती पोलिसांना का देतोस...? अश्या वादातून सदर घटना घडली असल्याची सर्वत्र चर्चा आहे. आपल्या भगत गांजा सारखे अमली पदार्थ सहजासहजी उपलब्ध होत असलेमुळे, गांजा सेवन करणार्यांचे प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. ( अगदी पानपट्टीत सुद्धा गांजा सहज उपलब्ध होत आहे. ) गांजा च्या सेवनाने लहान लहान मुलांचे आयुष्य बरबाद होत चालले आहे. तरुण पिढी यामध्ये ओढली जात आहे.
शिरोळ मध्ये घडलेल्या घटनेतील तरुण गांजा ओढतात, यासंदर्भातील माहिती शिरोळ पोलिसांना होती. काही दिवसांपूर्वी फक्त समज देऊन शिरोळ पोलिसांनी या तरुणांना सोडून दिले होते, अशी गावात सर्वत्र चर्चा आहे.या गुन्ह्यातील संशयीत तरुण पोलिसांच्या संपर्कात असल्याचे दिसत होते. पोलिसांनी वेळीच कारवाई न केल्यामुळे शिरोळ मधील घटना घडलेली आहे. या घडलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने अमली पदार्थ रॅकेट उध्वस्त करण्याची संधी आपल्याला मिळाली असून, खुनाबरोबरच अमली पदार्थ खरेदी विक्री रॅकेटचा तपास व्हावा.
वरील घटनेवरून पुढे असे गुन्हे घडू नयेत म्हणून, या अमली पदार्थ रॅकेटची सखोल चौकशी आपल्या स्तरावरून स्वतंत्र टिम नेमून करावी. अशी निवेदनात विनंती करण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा