शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क
शिरोळकरांना शुद्ध आणि मुबलक नियमित पाणी मिळावे, अमृत पाणी योजना पूर्ण करावी, यासह विविध मागण्यांसाठी युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्या 2 आठवड्यांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू होते. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपरिषद प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्यासमवेत कोल्हापुरात सोमवारी 21 एप्रिल 2025 रोजी आंदोलकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे सदरचे आंदोलन बैठक होईपर्यंत तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
आंदोलनास गुरुवारी शिरोळ परिसरातील लोककलाकारांनी दिला पाठिंबा :
शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे अशी मागणी करत युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला आज गुरुवारी शिरोळ परिसरातील लोककलाकारांनी लोककला सादर करत शिरोळ नगरपरिषद प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला व आंदोलनाला पाठिंबा दिला.
लोककलाकार रावसाहेब भोसले, राजेंद्र प्रधान, डॉ दगडू माने, मल्लू वायदंडे, सागर चव्हाण, लक्ष्मण शिंदे, भरत पाटील, आनंदा कुंभार, उदय शिरोळकर, अर्जुन शहापुरे, लक्ष्मण जगताप, प्रशांत माने, शिवाजी सुर्यवंशी, बाळासो कांबळे, सातार जादूगर, प्रमोद राणे, जयवंत पवार, सचिन कमलाकर, भगवान आवळे, प्रताप बनकर, धनाजी शिंदे, बसवराज टकळे, उदय ठोमके आदींनी लोककलेतून नगरपरिषद प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला, तसेच शिरोळकरांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे, नागरी सुविधा पूर्ण कराव्यात अशी मागणी केली.
दरम्यान, नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजता कोल्हापुरात आंदोलकांची यासंदर्भात बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कोणता निर्णय होतो....? हे पाहून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. त्यामुळे सोमवारपर्यंत सदरचे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. अशी माहिती युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी दिली.
यावेळी श्री. दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक दरगू गावडे, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, माजी सरपंच गजानन संकपाळ, माजी नगरसेवक पंडित काळे, इम्रान आत्तार, माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील नरदेकर, विजय आरगे, भगवान आवळे, आनंदराव माने देशमुख, अविनाश उर्फ पांडुरंग माने, रावसाहेब माने, कृष्णा भाट, एम. एस. माने, दिगंबर सकट, अनिल लोंढे, बाळासाहेब कोळी, बापूसाहेब गंगधर, चंद्रकांत भाट, देवाप्पा पुजारी, ओंकार गावडे, गजानन कोळी, भालचंद्र ठोंबरे, दिलीप संकपाळ, सिताराम शिंदे, शहाजी काळे, विशाल काळे, बाळासाहेब कांबळे यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला विविध क्षेत्रातील मान्यवर शिरोळकर नागरिकांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.
टिप्पणी पोस्ट करा