शिरोळ प्रतिनिधी :
कर्नाटक सरकार कडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचे यूद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत आणि त्या उलट महाराष्ट्र शासन स्तरावर स्मशान शांतता आहे. अलमट्टी धरनाची उंची वाढल्यास कायद्याने पावसाळ्याच्या काळात धरणातील पाणी पातळी ही 517 मीटर ऐवजी त्यांना 519 मीटर ठेवण्यास परवानगी मिळणार असून, तसे झाल्यास संपूर्ण शिरोळ तालुक्यासह इचलकरंजी सारखे औद्योगिक शहर आणि कोल्हापूर ला पण दरवर्षी पुराच्या पाण्याचा वेढा पडण्याचा धोका निर्माण होणार आहे.
यासंदर्भात आंदोलन अंकुश संघटना गेली 4 वर्षे प्रयत्नशील आहे. धनाजी चुडमुंगे म्हणाले, धरणाच्या उंची वाढीचे नोटिफिकेशन काढा, म्हणून कर्नाटक सरकार केंद्र सरकार च्या मागे लागले आहे आणि या महिना अखेर याबाबत जल शक्ती मंत्रालयाने दिल्लीत बैठक बोलावली आहे. महाराष्ट्र सरकार नेटाने या उंचीला विरोध करेल अशी आशा नसल्याने आता नागरिकांनीच या धरणाच्या उंचीला विरोध करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असं आमचं मत बनलं असून या उंचीला वरिष्ठ पातळीवर विरोध केल्यास नागरिकांची बाजू तिथे पर्यंत पोहोचणार आहे.
अलमट्टी धरणाच्या उंचीला नागरिकांनी लेखी पत्राद्वारे मोठया प्रमाणात विरोध दर्शवल्यास केंद्र शासनाला याची दखल घ्यावी लागणार आहे आणि शासनाने बेदखल केल्यास या तक्रारींच्या आधारे आपल्याला सर्वोच्च न्यायालयात जाता येईल म्हणून आम्ही तक्रारी जास्ती जास्त होतील याचे नियोजन केले आहे.
जिल्ह्यातील सर्व पूरग्रस्तांना विनंती आहे की, अशा प्रकारची लेखी तक्रार त्या त्या खात्याला रजिस्टर पोस्टाने करून त्याची पोस्टातील पोहोचची एक प्रत आमच्याकडे जमा करावी. भविष्यात दरवर्षी महापूर येऊन नुकसान होऊ द्यायचे नसेल तर या धरणाच्या उंचीला नागरिकांनी प्रखर विरोध करावा.
टिप्पणी पोस्ट करा