बजरंग ग्रुप शिरोळ च्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त अकरा फुटी भव्य हनुमान मूर्तीची स्थापना...





शिरोळ प्रतिनिधी : 


गेली सलग अकरा वर्षे शिरोळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी नावलौकिक असलेला हनुमान भक्तांचा ग्रुप म्हणजे शिरोळ मधील बजरंग ग्रुप.  हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याबरोबरच, बजरंग ग्रुप कडून हनुमान जयंती दिवशी महाप्रसादाचे देखील आयोजन केले जाते. बजरंग ग्रुपच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त अकरा फुटी हनुमान मूर्ती वेशितल्या हनुमान मंदिरात बसविण्याचा संकल्प सोडण्यात आला होता. 


या ग्रुपचे सदस्य असलेले व बजरंगबली हनुमानाचे निस्सीम भक्त असलेले कै.सुनील कदम यांचे स्मरणार्थ त्यांची दोन मुले प्रसाद कदम व अभिजीत कदम यांनी अकरा फुटी हनुमानाची मूर्ती अर्पण केली आहे. हनुमान मूर्ती अर्पण करून कदम बंधूंनी आपल्या वडिलांचे नाव अजरामर केले आहे. 


बुधवार दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी सदर मूर्तीचे शिरोळ मध्ये आगमन झाले. यावेळी शिरोळ गावातील हनुमान भक्त, मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत हनुमान मूर्तीची पूजाअर्चा करून गावाच्या मुख्य रस्त्यावरून ढोल-ताशे, टाळ मृदूंगाच्या निनादात मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. मूर्तीचे शिरोळ मधील चौका चौकात रांगोळी काढून स्वागत करण्यात आले. मिरवणुकी वेळी हनुमान भक्तांची प्रचंड गर्दी पहावयास मिळाली. ही मूर्ती वेशीतल्या हनुमान मंदिराच्या वर बसविण्यात आली आहे.




ही शोभायात्रा शिरोळचे माजी नगराध्यक्ष श्री.अमरसिंह पाटील(भैय्या), शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष श्री.रावसाहेब देसाई, श्री.राहुल यादव, श्री.संभाजी भोसले, श्री.अनिकेत जोशी महाराज, श्री.जयसिंगराव देसाई, शिरोळ मधील वारकरी संप्रदाय व हनुमान भक्त नागरिक यांच्या उपस्थितीत पार पडली.



तसेच नियोजन बजरंग ग्रुप चे अध्यक्ष रणधीर जगदाळे, उपाध्यक्ष राकेश शेट्टी, खजिनदार अमित क्षीरसागर, उपखजिनदार अरुण उर्फ पिंटू संकपाळ, सदस्य संदीप गावडे, नितीन गावडे, अभिषेक घोरपडे, अनिरुद्ध जाधव, विनायक पाटील (माऊली), सोहम सूर्यवंशी, सुशांत माने, महादेव मठपती, प्रसाद कदम शिवाजीराव पवार, कौशिक गावडे, इंदजीत माने, वैभव गावडे,अवधूत सावंत,निलेश मोरे,सागर मुडशिंगे,निलेश जाधव यांनी केले.


सदर मूर्तीचा लोकार्पण सोहळा हनुमान जयंती दिवशी म्हणजे, चैत्र पौर्णिमेला, शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी केला जाणार आहे. तसेच सालाबाद प्रमाणे याहीवर्षी हनुमान जन्मोत्सवानिमित्त सायंकाळी ठीक 7 वाजलेपासून, वेशितील हनुमान मंदीर समोर महाप्रसादाचे आयोजन केले गेले आहे. तरी महाप्रसादाचा लाभ जास्तीत जास्त हनुमान भक्तांनी घ्यावा असे आवाहन बजरंग ग्रुप तर्फे करण्यात आले आहे.








Post a Comment

थोडे नवीन जरा जुने