भगवान महावीर जयंती निमित्त औरवाड येथे 55 रक्तदात्यांनी केले रक्तदान...



विशेष प्रतिनिधी : प्रा. चिदानंद अळोळी



द्रव्यदानं परम दानम्‌, अन्नदानम 

ततोधिकम्, ततः श्रेष्ठ रक्तदानम्


रक्त म्हणजे ‘जीव’ असे सुश्रुताचार्यानी म्हटले आहे. त्यामुळे अगदी सामान्य व्यक्तीही रक्तदान करून दुसऱ्याचा जीव वाचवून जीवितदान करण्याचे पुण्य मिळवू शकते. म्हणून रक्तदान हे श्रेष्ठ दान होय. या तत्वाला प्रेरित होऊन वीर सेवा दल व चंदाबाबा ग्रुप औरवाड  यांच्यावतीने श्री १००८ भगवान महावीरांच्या २६२४ व्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्ताने औरवाड  येथे रक्तदान शिबिराचे आयोजन मंगळवार दि.०८/०४/२०२५ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत श्री. आदिनाथ दिगंबर जैन समाज हॉल येथे करण्यात आले होते.




या शिबिरामध्ये 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरास सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


श्री.आदिनाथ दिगंबर जैन समाज , वीर सेवा दल, चंदा बाबा ग्रुप औरवाड , अक्षय ब्लड बँक मिरज यांच्या वतीने रक्तदात्यांना प्रवासाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट अथवा स्टीलच्या पाण्याची बॉटल, तसेच  सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.





या संपूर्ण शिबिरासाठी अक्षय ब्लड बँक मिरज चे कर्मचारी मयुरी हवालदार, डॉ.सुलेमान तांबोळी, नम्रता देसाई. गुलाब मुजावर, हुसेन बेंद्रेकर, ऐश्वर्या खाडे यासह वीर सेवा दल , चंदाबाबा ग्रुप यांचे विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने