पश्चिम बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून हिंदूंना न्याय द्यावा :- विश्व हिंदू परिषद बजरंग दल



शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क 

 


४ एप्रिल २०२५ रोजी संसदेने वक्फ (सुधारणा) विधेयक २०२५ मंजूर केले. लोकसभेत १२ तासांहून अधिक काळ झालेल्या गहन चर्चेनंतर आणि त्यानंतर राज्यसभेत १४ तासांच्या चर्चेनंतर हे विधेयक मंजूर झाले.



याच वक्फ काय‌द्याच्या विरोधाच्या नावाखाली ज्या प्रकारे संपूर्ण बंगाल हिंसाचाराच्या आगीत जाळला जात आहे, हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत, राष्ट्र‌विरोधी आणि हिंदूविरोधी घटकांना त्यांचे कट कोणत्याही अडथळ्याशिवाय राबवण्यासाठी मोकळीक दिली जात आहे, त्यावरून बंगालमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याने तिथे राष्ट्रपती राजवट लागू करून हिंदूंना न्याय द्यावा या मागणीसाठी विहिप बजरंग दल तर्फे निदर्शने करत राष्ट्रपतीच्या नावे आज शिरोळ तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.. निवेदनात म्हंटले आहे की,

 


मुर्शिदाबाद पासून सुरू झालेला हा भयानक हिंसाचार, आता संपूर्ण बंगालमध्ये पसरताना दिसत आहे. सरकारी यंत्रणा केवळ दंगलखोरांसमोर निष्क्रिय झाली नाही, तर अनेक ठिकाणी ती त्यांची मदतनीस किंवा चिथावणी देणारी बनली आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वी, केंद्र सरकारने प्रशासनाचे नियंत्रण आणि व्यवस्थापन आपल्या हातात घ्यावे आणि देशद्रोही आणि हिंदूविरोधी घटकांना त्यांच्या दुष्कृत्यांसाठी कठोर शिक्षा करण्यात यावी..



११ एप्रिल २०२५ रोजी मुस्लिम जमावाने वक्फ काय‌द्याला विरोध करण्याच्या नावाखाली केलेली हिंसक निदर्शन हा कायदा बनवणाऱ्या सरकारविरुद्ध नव्हता तर तो हिंदूंवर केलेला हिंसक हल्ला होता, तर या कायद्याच्या निर्मितीत हिंदू समाजाची कोणतीही भूमिका नव्हती आणि ती पूर्णपणे संवैधानिक प्रक्रिया होती. याचा स्पष्ट अर्थ असा की वक्फ हे फक्त एक निमित्त होते; खरे उद्दिष्ट मुर्शिदाबादला हिंदू‌मुक्त करणे होते. या धर्माध जिहादी जमावाने हिंदूंची २०० हून अधिक घरे आणि व्यावसायिक दुकाने लुटली आणि जाळली, शेकडो हिंदूंना गंभीर जखमी केले आणि तीन नागरिकांना निघृणपणे ठार मारले. डझनभर महिलांवर बलात्कारही झाले. परिणामी, ५०० हून अधिक हिंदू कुटुंबांना मुर्शिदाबाद सोडावे लागले..त्यांच्याकडे जाऊन काळजी आणि मदत दाखवण्याऐवजी, सुश्री ममता बॅनर्जी दंगल भडकवणाऱ्या इमामांना भेटत आहेत  यावरून हे स्पष्ट होते की :-


*बंगालमध्ये भारताची संघराज्य रचना उद्ध्वस्त करून ममता सरकार आपले सरकार आणि मतपेढी वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते..बंगालमध्ये राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आहे..बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना मुक्तपणे प्रवेश दिला जात आहे. त्यांचे आधार कार्ड बनवले जात आहेत. पाकिस्तानी आणि बांगलादेशी दहशतवादी संघटनांच्या कारवाया वाढत आहेत..हिंदूंवरील हिंसाचार वाढत आहे आणि न्यायालयाच्या आदेशानुसारच हिंदू सणांना परवानगी आहे. त्यांना सुरक्षा देणाऱ्या निमलष्करी दलांना लक्ष्य केले जाते.हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आहे. कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. प्रशासनाला तृणमूल कॉंग्रेसच्या समाजविघातक घटकांच्या आणि जिहादी गुंडांच्या नियंत्रणाखाली आणि निर्देशानुसार काम करावे लागत आहे.* 


आज हि हिंसाचार मुर्शिदाबाद‌पासून संपूर्ण बंगालमध्ये पसरत आहे. आता हे बंगालपुरते मर्यादित राहणार नाही. म्हणून देशातील लोकांच्या मागणी नुसार बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करून बंगालमधील हिंसाचाराची एन.आय.ए.कडून चौकशी करून दोर्षीना तात्काळ शिक्षा व्हावी..सोबतच बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे नियंत्रण केंद्रीय सुरक्षा दलांकडे सोपवावे..बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना ओळखले पाहिजे आणि त्यांना हाकलून लावले पाहिजे..


सदर निवेदन प्रसंगी विश्व हिंदू परिषद बजरंग दल चे बजरंगी व हिंदू मोठया संख्येने उपस्थित होते.. हिंदुत्ववाद्यानी घोषणा बाजी करत परिसर दनानून सोडला..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने