बागायती पट्ट्याला उध्वस्त करण्याचे कर्नाटक चे धोरण... वेळेत जागे व्हा... अलमट्टीची उंची वाढी विरोधात हरकती दाखल करा : धनाजी चुडमुंगे



शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क


एका तालुक्यात 4 बारमाही वाहणाऱ्या नद्या जगाच्या पाठीवर कुठेही नसतील, असा हा बागायती शिरोळ तालुका उध्वस्त करण्याचा डाव कर्नाटक सरकारचा आहे आणि त्यामुळेच त्यांनी आलमट्टी धरनाची उंची वाढवण्याचे धोरण आखले आहे. कर्नाटक सरकार चा हा डाव हाणून पाडण्यासाठी आलमट्टी च्या उंचीला आमचा विरोध आहे. म्हणून मोठया संख्येने अलमट्टी धरणाच्या ऊंची वाढी विरोधात हरकती दाखल कराव्यात. असे आवाहन घालवाड येथे झालेल्या सभेत आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केले. ते काल रात्री घालवाड येथील राम मंदिर चौकातील सभेत बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रमोद थोरात होते.



या सभेत बोलताना धनाजी चुडमुंगे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य शासन अलमट्टी धरणाच्या संभावित उंचीला कायदेशीर विरोध करायला कमी पडत असले, तरी नुकसान ग्रस्त नागरिक म्हणून आपण या उंची वाढीला विरोध करायला पाहिजे. कारण, जर या धरणाची उंची वाढली तर दरवर्षी पूर गंभीरता निर्माण होण्याचा धोका आहे आणि भविष्यात उद्भवणारा हा धोका टाळण्यासाठी म्हणून हजारो हरकती केंद्र सरकार कडे पाठवाव्यात. असेही शेवटी त्यांनी उपस्थितांना केले.


यावेळी आंदोलन अंकुश चे राकेश जगदाळे, महेश जाधव, कृष्णा देशमुख यांच्यासह सारंग परीट, दिपक काळे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ तोडकर, संजय फडतारे, आदिक निकम, पांडुरंग जाधव व ग्रामस्थ मोठ्या संखेने  उपस्थित होते.



म्हैशाळ ब्यारेज मुळे घालवाड मधील पोट मळ्यात वर्षभर पाणी राहणार आहेच, पण हे ब्यारेज नदी अडवून होत असल्यामुळे महापुराचा सर्वात जास्त फटका घालवाडला बसणार आहे. ग्रामसभा घेऊन या ब्यारेजला संपूर्ण गावाने विरोध करावा. असे आवाहनही धनाजी चुडमुंगे यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने