शिरोळ नगरपरिषद प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारच्या विरोधात उद्या आंदोलन अंकुश संघटनेकडून शिरोळ बंद ची हाक ...


 आंदोलन कर्त्या अक्षय पाटील ची  तब्येत बिघडली ...



शिरोळ प्रतिनिधी : 


शिरोळ नगरपरिषदेच्या नवीन पाणी पुरवठा योजनेमध्ये परस्पर नळ कनेक्शन देऊन लाखों रूपयांचा घोटाळा झालेला असून, या प्रकरणी दोन लिपिक निलंबित झालेले आहेत. हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नसून, या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. यासाठी एक चौकशी समिती नेमावी व या समितीमध्ये दोन नागरिक देखील घ्यावेत. अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेकडून करण्यात आली आहे. यासाठी कालपासून शिरोळ नगरपरिषदेच्या दारातच आंदोलन अंकुश संघटनेचे अक्षय पाटील उपोषण सुरू आहे. परंतू नगरपरिषद प्रशासनाकडून नागरिकांना समितीत घेण्यास नकार देण्यात आला.





आज उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी आंदोलांकर्त्यांनी एक पाऊल मागे येऊन चौकशी समितीमध्ये नागरिक घ्यायचे नसतील तर राहुदे. प्रशासकीय लेवल ला अधिकार्‍यांची कमिटी करावी. त्यामध्ये अकाऊंटंट, दोन इंजीनियर, प्रशासकीय अधिकारी यांना घेऊन समिती करावी व नवीन नळ कनेक्शन दिलेल्या भागात घर टु घर जाऊन सर्वे करावा. तसेच नागरिकांनी केलेल्या सूचना गांभीर्याने घेऊन, चौकशी समितीने त्यावर सर्वे करावा. 


परंतू नगरपरिषद प्रशासन घर टू घर सर्वे करण्यास तयार नाही. जेवढ्या तक्रारी येतील, त्यांचीच चौकशी केली जाईल या मतावर प्रशासन ठाम आहे. याचा अर्थ खरी चौकशी प्रशासनाला करायची नाही. दोषींच्यावर कारवाई व्हावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाला सुद्धा वाटत नाही. असा आरोप आंदोलन अंकुश चे अक्षय पाटील यांनी केला आहे. 




उद्या शिरोळ गाव बंद चे आवाहन : 


संविधानिक मार्गाने आंदोलन करून, प्रशासनाकडे रास्त मागण्या केलेल्या असताना हे मुरदाड प्रशासन ऐकायला तयार नाही. लोकशाही मध्ये जनता मालक आणि  हे अधिकारी नोकर असताना, हे अधिकारी लोकांना किंमत द्यायला तयार नाहीत. गलेलठ्ठ पगार असताना वरकमाई करायची चटक लागलेले हे सरकारी कर्मचारी व अधिकारी यांचा माज जनतेने उतरवणे गरजेचे झालेले आहे. शिरोळकर नागरिकांनी देखील आपल्या खिशातील पैसे लुबाडनार्‍यांना धडा शिकविण्यासाठी व अन्यायाच्या विरोधात उभे राहण्यासाठी उद्या गाव बंद ठेऊन अक्षय पाटील सारख्या युवा आंदोलकाला पाठिंबा द्यावा. असे आवाहन आंदोलन अंकुश चे प्रमुख श्री. धनाजी चुडमुंगे यांच्याकडून करण्यात आले आहे.  


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने