पोलिसांनी शिरोळ तालुका व्यसनमुक्त करून आपली जबाबदारी पार पाडावी : स्वाभिमानी स्वराज्य सेना




शिरोळ प्रतिनिधी : मंगेश नलावडे

        
      शिरोळ तालुक्यामध्ये अवैध व्यवसायांचा सुळसूळाट झाला असून, तरुणपिढी पूर्णपणे व्यसनाधीन होतं चालली आहे. त्यामुळे पोलिसांनी अवैध व्यवसायांवर निर्बंध आणून शिरोळ तालुका व्यसनमुक्त करावा. अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे शिरोळ तालुका अध्यक्ष श्री.खंडेराव कांबळे यांनी शिरोळ पोलीस स्टेशन ला दिले आहे.

     
      शिरोळ तालुक्यामध्ये कर्नाटक तसेच  सांगली, मिरजेतून गांजा, नशेच्या गोळ्या शिरोळ तालुक्यामध्ये विक्रीस येतात आणि शिरोळ तालुक्यातील शहरांसह, ग्रामीण भागातील लोकांच्या पर्यंत पोहोचवीला जातो. नशिले पदार्थ सहज उपलब्ध होऊ लागल्यामुळे तरुण पिढी यात वाहवत चालली आहे.  व्यसनाधीन तरुणांची संख्या तालुक्यात प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे येणार्या तरुण पिढीला या खाईतून बाहेर काढण्यासाठी पोलिस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी व अवैधरीत्या नशिले पदार्थ विकून तरुण पिढी बरबाद करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी स्वाभिमानी स्वराज्य सेनेमार्फत करण्यात आली आहे.

   
       यावेळी संतोष सांबळे, शरद कांबळे, विशाल कांबळे नादणीकर हे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने