शिरोळच्या गाव चावडी कारभारा विरोधात शेतकऱ्याचे गावचावडीतच आंदोलन....



शिरोळ प्रतिनिधी : 


      शिरोळ येथील शेतकरी फिडेल केशव माने यांनी शिरोळ गावचावडीच्या कारभारा विरोधात गाव चावडीतच आंदोलन चालू केले. 


     शिरोळ चे ग्राम विकास अधिकारी श्री. संभाजी घाटगे व मंडळ अधिकारी सूर्यवंशी साहेब यांनी वारसा बाबत घरगुती वाद जयसिंगपूर दिवाणी न्यायालयात पेंडिंग असताना न्यायालयाच्या निकालाची वाट न बघता तत्परतेने वारसा लावण्याचे काम केले. सदर वारसा फेरफार मंजूर केलेचे समजताच याविरोधात श्री. फिडेल केशव माने हे गाव चावडीतच आंदोलनाला बसले. 




    याबाबत श्री.फिडेल माने यांच्याशी विचारणा केली असता... त्यांचे वडील केशव माने हे मयत झाले नंतर वारसा लावणे बाबत त्यांचा घरगुती वाद न्यायालयात गेला. तोपर्यंत वारसा लावण्यात येऊ नये म्हणून फिडेल माने यांनी गावचावडीत अर्ज केला होता. सदर विषय मंडळ अधिकारी शिरोळ यांचे समोर गेला असता, त्यांनी न्यायालयाच्या निकालाची वाट न बघता वारसा लावणे बाबतचा फेरफार मंजूर केला. तरी सदर तलाठी, मंडळ आधिकरी यांना गावातून हाकलून देण्याची मागणी श्री. माने यांनी केली.


    सदर आंदोलन स्थळी रात्री उशिरापर्यंत आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख श्री. धनाजी चुडमुंगे, संघटनेचे कार्यकर्ते-पदाधिकारी व गावातील लोक मोठ्या संख्येत जमा झाले होते, तसेच मंडळ अधिकारी सूर्यवंशी यांना गावातील लोकांनी प्रश्नांचा भडीमार केला व अश्याच प्रकारे गावातील इतर लोकांचे प्रश्न देखील तत्परतेने सोडवण्याचा सल्ला दिला.


     सदर प्रकरणी मंडळ अधिकारी सूर्यवंशी यांनी सदर प्रकरण पुनरविलोकनासाठी तहसिलदार शिरोळ यांचेकडे पाठविले आहे व तहसीलदार शिरोळ यांनी बुधवारी सकाळी 11 वाजता बैठक बोलावली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने