भिवंडी येथे झालेल्या राज्यस्तरीय उर्दू वक्तृत्व स्पर्धेत शिरोळची कन्या "इशरत अझहरूद्दीन मुल्ला" प्रथम ....

 




शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क 


भिवंडी (ठाणे) येथे झालेल्या 66 व्या ऑल महाराष्ट्र स्टेट लेवल उर्दू वक्तृत्व (तकरीर)स्पर्धेमध्ये शिरोळच्या समतानगर  भागात राहण्यास असलेली व  डॉ. अल्लामा इकबाल हायस्कूल, कुरुंदवाड ची विद्यार्थिनी कुमारी इशरत अझरुद्दीन मुल्ला हिने  प्रथम क्रमांक पटकावला आहे. इशरतचा राज्यस्तरीय एवढ्या मोठ्या स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याने शिरोळ सह परिसरात तिच्यावर शुभेछ्यांचा वर्षाव होतं आहे. तिचा सन्मान चिन्ह पारितोषक  देऊन गौरव करण्यात आला आहे. 


या स्पर्धेसाठी इशरत मुल्ला हिला डॉ. अल्लामा इकबाल हायस्कूल , कुरुंदवाड चे मुख्याध्यापक श्री. सज्जाद अहमद पटेल , श्री. इब्राहिम फैज, वर्गशिक्षक श्री. युनुस चौगुले, श्री. मुन्ना मकानदार, अ. रशीद भुसारी  व सर्व शिक्षक स्टाफ यांचे मार्गदर्शन लाभले. तिने मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने