निवडणूक 2025 ; शिरोळमध्ये वॉर्ड ची एकूण मतदार संख्या व मतदार यादीत घोळ...

 




शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क


राज्यामध्ये नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका लवकरच लागणार हे आता जवळपास निश्चित झालेले आहे. शिरोळ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी काल 8 ऑक्टोबर रोजी प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झाले. त्याच बरोबर प्रभाग निहाय याद्या देखील जाहीर झाल्या आहेत. 


या प्रभाग निहाय मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर एका वॉर्ड मध्ये किती मतदार असणार हे देखील स्पष्ट झालेले आहे. यावरून प्रभागाच्या मतदार निहाय रचनेत मोठा घोळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिरोळ मध्ये सध्या 24539 च्या आसपास एकूण मतदार आहेत व 10 प्रभाग आहेत. यानुसार एका प्रभागात 2400-2500 च्या जवळपास मतदार असणे आवश्यक होते. परंतु काल प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार प्रभागात असलेल्या एकूण मतदारांची संख्या पुढील प्रमाणे : 


प्रभाग क्रमांक          एकूण मतदार 

      1                          2274

      2                          1874

      3                          2900

      4                          2573

      5                          1067

      6                          2301

      7                          3148

      8                          3521

      9                          2814 

      10                        2067 



अशाप्रकारे लोकसंख्या आहे. यावरून प्रभाग क्रमांक 5 मध्ये 1067 च्या आसपास लोकसंख्या व  प्रभाग क्रमांक 8 मध्ये 3500 च्या आसपास लोकसंख्या. एवढा दोन प्रभागातील मतदार संख्येमध्ये फरक आहे. त्याचबरोबर मतदार यादी यांच्या बाबत देखील नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी येत आहेत. नागरिक राहत असलेल्या प्रभागात त्यांचे नाव न येता, इतर प्रभागात नाव आल्याचे किंवा कुठेच नाव सापडत नसल्याचे अनेक नागरिक म्हणत आहेत. याबाबत नागरिकांना 13 ऑक्टोबर पर्यन्त नगरपरिषद कार्यालयात हरकती नोंदविता येणार आहेत.



नगरपरिषद मधील अधिकाऱ्यांशी बोललो असता 2011 साली झालेल्या जनगणनेनुसार, लोकसंख्या गृहीत धरून प्रभाग निश्चित करणे. याबाबत शासन निर्णय आहे. त्याप्रमाणे आम्ही काम केले आहे, असे उत्तर मिळाले.


प्रशासनाने पाट्या टाकायचे काम केल्याने सगळी वार्ड रचना चुकली आहे. 5 नंबर वार्ड 1067 मतदार नगरसेवक निवडणार आणि 8 नंबर वार्ड मध्ये 3521 मतदार नगरसेवक निवडणार. दोन्ही वार्डात 2-2 नगरसेवक निवडून येणार. दोघेही त्या त्या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करणार, पण तिप्पटीने मतदार संख्येत फरक का..? डोळे झाकून आणि पगारासाठी नोकरी करणारे झापडबंद अधिकारी असले कि, अशी लोकशाही ची थट्टा मांडली जाते.अशा अधिकाऱ्यांना जनतेच्या हितार्थ काम लावायला पाट्या टाकणारे नगरसेवक काही कामाचे नाहीत हे लक्षात घ्या. - धनाजी चुडमुंगे, आंदोलन अंकुश 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने