शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क
शिरोळ तालुक्यातील लिंगायत समाजातील युवक एकत्र येऊन प्रत्येक वर्षी निरनिराळे उपक्रम राबवत असतात. यावर्षी देखील शिरोळ तालुका लिंगायत समाजाच्या वतीने तालुक्यातील १० वी, १२ वी व स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, दरवर्षी प्रमाणे मान्यवरांच्या प्रबोधनातून संपन्न झाला. सदर कार्यक्रम शिरोळ मधील टारे मल्टीपर्पज हॉल येथे रविवार, दिनांक 1 जून रोजी संध्याकाळी 4 वाजता पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून व लिंगायत समाजातील बसवतत्व प्रचारक स्वर्गीय राजेंद्र शहापूरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गजेंद्र कुल्लोळी, कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन पाटील, प्रा.मनोहर कोरे, प्रा. मंगेश जोंग, सहाय्यक पोलीस निरिक्षक मिनल फुटाणे, उद्योजक -मारुती माळी यांनी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना आपला अनुभव सांगत दहावी, बारावी नंतर काय करावे याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ.बी.के.देवताळे, अजित कोरे, बी.एस.पाटील, डॉ.जे.बी.पाटील,जमखंडे सर, आण्णासाहेब कागले, रमेशकुमार मिठारे, स्वप्निल कुंभार, सच्चिदानंद आवटी, संजय शहापूरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वागत स्वप्निल माळी यांनी केले तर प्रस्तावना शरण मनोजकुमार रणदिवे सर यांनी केले. तर आभार स्वप्निल चौगुले यांनी मानले. सुत्रसंचलन महेश घोटणे यांनी केले. सदरच्या कार्यक्रमास परिसरातील समाज बांधव, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुंदर नियोजन स्वप्नील चौगुले, संजय शहापूरे, प्रसन्ना परीट, राजेंद्र चौगुले, स्वप्नील माळी, सुनील ऐनापुरे, संजू अपिने आणि टीम ने केले.
टिप्पणी पोस्ट करा