महापुरासाठी शिरोळ तालुक्याची स्वतंत्र बैठक घ्यावी : आंदोलन अंकुश

 





शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क



जागतिक बँकेच्या सहकार्याने सुरू असलेल्या प्रस्तावित विकास आराखड्यामध्ये महापूरावर उपाययोजना सुचवण्यासाठी शिरोळ तालुक्याला  स्वतंत्र  बैठक घ्यावी, अशी विनंती मा. जिल्हाधिकारीसो अमोल येडगे यांच्या कडे आंदोलन अंकुश संघटनेने निवेदनाद्वारे केली. निवेदनात म्हंटले आहे की,


सांगली, कोल्हापूर सह शिरोळ तालुक्यामध्ये दरवर्षी महापूर येत असतो. महापुराचा सर्वात जास्त फटका शिरोळ तालुक्याला बसतो. या ठिकाणी महापूर ओसरल्यानंतर सुद्धा पंधरा दिवस पाणी साठुन राहते. त्यामुळे इथली पिके कुजून जातात. व्यवसाय, जनजीवन पुर्णपणे विस्कळीत होऊन जाते. महापूर येऊन जातो, पण महापुराचे पाणी साठुन जे नुकसान होतं, त्याला 2005 नंतर इथे झालेली विकास काम ,पूल व त्यांचे भराव, नदीपात्रातील अडथळे, साठलेला गाळ, मुजलेले नाले, या सर्व गोष्टी कारणीभूत आहेत. त्यामध्ये तांत्रिक बदल केला  असता पुराचं गांभीर्य कमी करू शकतो.



त्यामुळे शिरोळ तालुक्यातील विविध भागातील वरील सर्व गोष्टींच्या वर विचारमंथन करून प्रस्तावित विकास आराखड्यामध्ये समावेश करण्यासाठी  शिरोळ तालुक्याला वेगळी बैठक  घ्यावी. 



यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक पाटील, भगवान कोईगडे, महेश जाधव, सुनील दिक्षित, संपत मोडके इ. उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने