श्री महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव 2025 व्याख्यानमालेला सुरुवात : सोमवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन...




 शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क 



समस्त लिंगायत समाज संस्था शिरोळ यांच्याकडून श्री महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव 2025 व्याख्यानमालेला २५ एप्रिल 2025 रोजी सुरुवात झाली...  शुक्रवार दिनांक 25 एप्रिल रोजी प्रा. विष्णू भोसले सर यांचे दहावी बारावीनंतर शिक्षणाच्या वाटा या विषयावर व्याख्यान झाले. शनिवार दिनांक 26 एप्रिल रोजी प्राध्यापक सुनील हिंगणे सर लातूर यांचे लिंगायत धर्म संस्कार या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी आ.डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील विविध गावांमध्ये लिंगायत समाजाच्या हॉलसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा शिरोळ लिंगायत समाज बांधवांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आ.यड्रावकर यांनी लिंगायत समाजाने शिरोळ पंचायत समिती कार्यालय आवारात महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसविण्याची केलेली मागणी विचारात घेऊन, याबाबत शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली.



आज रविवार दिनांक 27 एप्रिल रोजी सायंकाळी 6:30 वाजता अॅड. ममतेश रामदास आवळे यांचे लोकशाही जनक बसवांना या विषयावरती व्याख्यान होणार आहे.



उद्या सोमवार दि. 28 एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिर : 



सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील लिंगायत समाज शिरोळ यांचेकडून उद्या सोमवार दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 1 या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. संध्याकाळी साडे 6:30 वाजता अॅड. अभिषेक मिठारी (सिनेट सदस्य शिवाजी विद्यापीठ) यांचे महिला स्त्री स्वातंत्र्य व भारतीय संविधानातील त्यांचे अधिकार या विषयावर व्याख्यान होणार आहे.




मंगळवार दिनांक 29 एप्रिल रोजी सायंकाळी 6:30 वाजता शरण प्रा.राजा माळगी (लिंगायत धर्म प्रचारक) यांचे बसवेश्वरांचा कायक सिद्धांत या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच दलितमित्र डॉ. आमदार अशोकराव कोंडीबा माने यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.




बुधवार दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता प्रतिमा पूजन करण्यात येणार आहे. सायंकाळी 4 वाजता भव्य पालखी मिरवणूक शिरोळ गावच्या मुख्य मार्गांवरून काढण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत सालाबादप्रमाणे सांगता समारंभ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.



सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती, शिरोळ चे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य समाजासाठी आपले योगदान देण्यासाठी व जगदज्योती महात्मा बसावेश्वरांचे विचार सर्व समजबांधवांपर्यंत पोहचविण्यासाठी कष्ट घेत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने