शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क
5% दिव्यांग निधीसह अन्य मागण्यांच्या संदर्भात, तालुक्यातील अंकुश दिव्यांग सहायता संस्थेच्या वतीने दिव्यांग बांधवांनी, शिरोळ तहसीलदार कार्यालया समोर आज सोमवार दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता उपोषणास सुरुवात केली होती. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सह कुरुंदवाड,जयसिंगपूर व शिरोळ नगरपरिषद कडून 5% दिव्यांग निधी मध्ये यावर्षी वाढीव रक्कमा जमा कराव्यात या मागणीसाठी दिव्यांग बांधव एकत्र येऊन आज पासून उपोषणास बसले होते.
दरम्यान, तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी आपल्या दालनात उपोषणकर्ते आणि प्रशासनाची बैठक घेतली असता व त्यामध्ये जयसिंगपूर आणि कुरुंदवाड नगरपरिषद ने 5% दिव्यांग निधी दुप्पट जमा केल्याचे सांगितले व शिरोळ नगरपरिषद ने दुप्पट निधी उपलब्ध करून देत असल्याचे पत्र दिल्याने उपोषण रद्द करण्यात आले.
या बैठकीला गट विकास अधिकारी श्री. घोलप साहेब, शिरोळ जयसिंगपूर नगरपरिषदेचे अधिकारी, आंदोलन अंकुश चे धनाजी चुडमुंगे उपस्थित होते.
आजच्या उपोषनात विनायक चुडमुंगे, राजू गावडे, वैशाली माने, आनंदा तोरस्कर, ओंकार कांबळे, प्रवीण तांबे, प्रसाद पाटील, राजेंद्र माळी, रघुनाथ तावदारे, यांच्यासह आंदोलन अंकुश चे जिल्हाध्यक्ष दिपक पाटील, महेश जाधव, कृष्णा देशमुख व तालुक्यातून आलेले दिव्यांग मोठया संख्येने सहभागी झाले होते.
टिप्पणी पोस्ट करा