मृत कोंबड्यांच्या खच
शिरोळ प्रतिनिधी : मंगेश नलावडे
शिरोळ मध्ये दत्त कारखान्याच्या समोर पाटील पोल्ट्री फार्म नावाने युवा शेतकरी श्री.अक्षय पाटील यांचे देशी कोंबड्यांचे पोल्ट्री फार्म आहे. अतिशय जिद्दीने अक्षय यांनी कोंबड्यांची लहान पिल्ली आणून गेली 6 महिने त्यांना जीवापाड जपले. येत्या 8 दिवसात त्या कोंबड्या अंडी द्यायला चालू करणार होत्या.
परंतू रविवारी पहाटे 10 ते 12 भटक्या कुत्र्यांनी पोल्ट्री ची जाळी दाताने तोडून पोल्ट्रीत प्रवेश केला व बघता बघता 200 ते 220 कोंबड्यांच्या फडश्या पडला. काहींची मुंडकी तोडून टाकली, तर काही कोंबड्यांना फरफटत शेजारील ऊसाच्या शेतात नेले. काही कोंबड्या घाबरून मेल्या.
पहाटे 5 वाजता नेहमी प्रमाणे अक्षय कोंबड्यांना खाद्य घालण्यासाठी उठला असता.. मृत कोंबड्या आणि रक्तबंबाळ झालेली पोल्ट्री बघून त्या युवा शेतकऱ्याचा जीव धस्स झाला.
8 दिवसात त्या कोंबड्या अंडी द्यायला चालू करणार होत्या. आज लहान पिल्ला पासून मोठी कोंबडी होईपर्यंत घेतलेले सर्व कष्ट त्या युवा शेतकऱ्याचे वाया गेले. शेती करत, शेती पूरक व्यवसाय करण्याचे त्याचे स्वप्न भंग झाले.
पोल्ट्री मालक, युवा शेतकरी असलेल्या अक्षयशी बोलणे झाले असता, अक्षय म्हणाला... आता पुन्हा नव्याने सुरवात करायची. हे अश्याप्रकारचे वारंवार होणारे आघात एक शेतकरीच सोसू शकतो. हे मात्र अक्षय च्या बोलण्यातून पुन्हा सिद्ध झाले.
जबाबदारी कोणाची : नगरपरिषदेचे दुर्लक्ष
भटक्या कुत्र्यांचा गंभीर प्रश्न शिरोळ शहरात निर्माण झालेला असून, रक्ताची चटक लागलेली ही भटकी कुत्री कधी अशी प्राण्यांना फाडतात, तर कधी माणसांच्या अंगावर जातात.
अश्या काहीतरी घटना घडल्यावर नगरपरिषदेकडून काहीतरी तात्पुरती उपाययोजना केल्याचे सांगितले जाते. परंतू मुख्याधिकारी श्री.प्रचंडराव साहेब यांनी सदर प्रश्न गांभीर्याने घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी. अशी मागणी शिरोळ मधील नागरिकांच्यातून होतं आहे.
टिप्पणी पोस्ट करा