शिरोळ प्रतिनिधी :
शेतीच्या बाबतीत अखंड भारतात अनुकूल वातावरण असलेल्या शिरोळ तालुक्यात धान्याचा ठरलेला कोटा (इष्टांक) संपल्यामुळे रेशनकार्ड ची सर्व नवीन कामे गेल्या दोन महिन्यांपासून बंद होऊन, पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील गरजू लोकांना सध्या धान्य मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे.
प्राधान्य कुटुंब लाभार्थी (PHH) अश्या प्रकारच्या रेशन कार्डचे 70 ते 80% लाभार्थी शिरोळ तालुक्यात आहेत. ( म्हणजे धान्य मिळत असलेले केशरी रेशन कार्ड ) मग एवढ्या मोठ्या प्रमाणात रेशन कार्ड असलेल्या लोकांचे काम प्राधान्याने होणे गरजेचे असताना, गेल्या दोन महिन्यापासून PHH प्रकारच्या रेशन कार्ड ची कामे धान्य कोटा संपला असले कारणाने म्हणजे शासकीय भाषेत इष्टांक संपला असले कारणाने पूर्ण बंद झाले आहे.
तालुक्यातील 1200 अर्ज मंजूर असून अजून धान्यापासून वंचित :
सध्या शिरोळ तालुक्यासाठी प्राधान्य कुटुंब लाभार्थी ( धान्य मिळत असलेले केशरी रेशन कार्ड ) चा मंजूर इष्टांक 236600 इतका आहे व वापरनेत आलेला इष्टांक 236569 इतका आहे. म्हणजे जवळ जवळ संपला आहे. त्यामुळे पुरवठा विभागाला अश्या प्रकारच्या रेशन कार्ड मध्ये सध्या कसल्याही प्रकारचे बदल करता येत नाहीत. डिसेंबर 2024 पर्यन्त तालुक्यातील 1200 रेशन कार्ड धान्य मिळण्यासाठी पात्र ठरलेले होते, तसेच जानेवारी व फेब्रुवारी 2025 मधील न स्वीकारलेले अर्ज अश्या सर्वांना शासनाने धान्य मिळण्यापासून वंचित ठेवले आहे.
उमेदवारांचा सुळसुळाट, अधिकारी मालामाल :
पुरवठा विभागाची कामे ऑनलाइन झालेली आहेत, तरीसुद्धा पुरवठा विभागात उमेदवार ठेवण्याचे कारण काय...?तशी परवानगी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी दिलेली आहे काय...? अश्याप्रकारचे उमेदवार ठेवण्याची कोणतीही परवानगी नसून पैसे उमेदवारांच्या कडून आपल्या खिशात घालण्यासाठी असे उमेदवार अधिकार्यांनी वर्षानुवर्षे ठेवले आहेत.
गेल्या 2 ते 3 वर्षात शिरोळ तालुक्यातील रेशन कार्ड ची कामे अत्यल्प प्रमाणात करून पैसे मिळवण्याकडे जास्त लक्ष पुरवठा विभागातील अधिकार्यांनी दिल्यामुळे शिरोळ तालुक्याचा इष्टांक परत गेला व तो इष्टांक कोल्हापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यात वापरला गेला, अशी अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. याचा अर्थ पुरवठा अधिकारी किंवा पुरवठा निरीक्षक मिळवत असलेल्या पैश्याची वाटणी कोणा कोणाला होती...?
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष :
लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडून दिले गेलेले लोकप्रतींनिधी कधी तरी सर्वसामान्यांच्या फायद्याच्या विषयात लक्षं घालणार आहेत का...? काय तालुक्यातील आपल्या कार्यकर्त्यांच्यात कोण मेलं, कोण जन्माला आलं, कुणाचं लग्न, कुणाचं बारसं हेच करत बसणार आहेत काय ...? लोक प्रतिनिधींची मूळ कामे बाजूला ठेऊन असल्याच कामांच्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे काय...? असा सवाल शिरोळ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा