जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश डावलून, फक्त वरकमाई करण्यासाठी पुरवठा विभागात उमेदवारांचे स्वतंत्र टेबल : सामाजिक कार्यकर्ते अभिजीत पाटील








शिरोळ प्रतिनिधी : मंगेश नलावडे


चिपरी, ता. शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. अभिजित पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार तक्रार केल्यानंतर दिनांक 29/01/2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालया कडून, जिल्हा पुरवठा अधिकारी कोल्हापूर यांच्या सहीने सर्व तहसीलदार यांना, खाजगी व्यक्ती यांचे कडून पुरवठा विभागातील कामकाजात होणाऱ्या हस्तक्षेपास प्रतिबंध करणे बाबत पत्र व्यवहार केलेला आहे. 


सदर पत्रात सक्त सूचना करण्यात आलेली आहे की, आपले अधिनस्त कार्यालयात पुरवठा विषयक कामकाजामध्ये खाजगी व्यक्तीचा कोणताही हस्तक्षेप होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शासकीय कामकाजामध्ये खाजगी व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे भविष्यात कोणती अनियमितता आढळून आलेस,त्याची सर्वस्वी जबाबदारी आपलेवर निश्चित करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. तसेच कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे कामकाज विहीत मुदतीत करण्याची दक्षता घ्यावी.



सर्वस्वी जबाबदारी आपली राहील व आपल्यावर कारवाई करण्यात येईल, अशी सक्त सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून असताना देखील शिरोळ तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागात, पुरवठा अधिकाऱ्यांच्या समोर खाजगी व्यक्तींचा सुळसुळात झालेला आहे. 



पुरवठा अधिकाऱ्यांच्या समोरच 5 खाजगी व्यक्ती पुरवठा विभागात काम करत असतील, तर सदर सर्व खाजगी व्यक्ती वरकमाई कारण्यासाठीच पुरवठा अधिकाऱ्यांनी नेमणूक केलेले असण्याची शक्यता आहे. अशी कडक शब्दात टीका चिपरीचे सामाजिक कार्यकर्ते श्री. अभिजीत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली. 






 या संदर्भात आज दिनांक 21 मार्च 2025 रोजी श्री. विजय बाळू सनदी यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पुरवठा विभागात खाजगी व्यक्ती काम करीत असलेला व्हिडिओ पुरावा वेळ, दिनांकासह दाखवून, सोबत तक्रार अर्ज केला आहे.  या तक्रार अर्जात नायब तहसीलदार वैशाली माळी या रुजू झाल्यापासून त्यांनी 5 खाजगी उमेदवार कार्यालयात ठेवून, त्यांच्या मार्फत कार्यालयाचे कामकाज करत असतात. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी तात्काळ 29/01/2025 च्या पत्रानुसार जबाबदारी निश्चित करून पुरवठा निरीक्षक व नायब तसीलदार सौ.माळी यांचे वर कारवाई करावी. अन्यथा हातकणंगले सारखा प्रकार झाल्यास आपणास सर्वस्वी जबाबदार धरून कारवाईची मागणी करण्यात येईल. असा उल्लेख केलेला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने