मराठा सेवा संघ संचलित " जिजाऊ रथयात्रा - २०२५ " चे शिरोळ मध्ये जोरदार स्वागत...



शिरोळ प्रतिनिधी : 


मराठा सेवा संघ संचलित..  जिजाऊ रथयात्रा 2025... मराठा जोडो अभियान यात्रा आज 22 मार्च रोजी ऐतिहासिक अश्या छत्रपती शिवाजी महाराज तख्त समोर, शिरोळ मध्ये दाखल झाली. शिरोळकर नागरिकांकडून जिजाऊ रथयात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. 






यावेळी अर्जुन तनपुरे (प्रदेशाध्यक्ष मराठा सेवा संघ), सौरभदादा खेडेकर ( रथयात्रा प्रमुख ), महिपती बाबर (कोल्हापूर जिल्हाध्यक्ष, मराठा सेवा संघ), संजय देसाई, डॉ.पारदी रथयात्रे सोबत उपस्थित होते.


18 मार्च 2025(शहाजी महाराज जयंती) रोजी वेरूळ, जि. छत्रपती संभाजी नगर येथून सुरुवात झालेली ही रथयात्रा 4 दिवसांचा प्रवास करून आज शिरोळ मध्ये दाखल झाली. या रथयात्रेचा समारोप 1 मे 2025 ( महाराष्ट्र दिन / कामगार दिन ) रोजी लाल महाल, पुणे येथे होईल. या 45 दिवसांच्या रथयात्रेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रमुख शहरे, निमशहरे आणि गावांमध्ये जनसंवाद साधण्यात येईल. कोकणातील तळ भाग वगळता संपूर्ण राज्यभर हा ऐतिहासिक उपक्रम पार पडणार आहे.



               आंदोलन अंकुश संचलीत शेतकरी वजन काट्यावर देखील रथयात्रेचे स्वागत करण्यात आले.                   


जिजाऊ रथयात्रेचे आयोजन करण्याचे कारण : 


जातीयवाद, गुन्हेगारी, भ्रष्टाचार,  धार्मिक आणि राजकीय उन्माद यांसारख्या अनेक कारणांनी सामाजिक एकता धोक्यात आली आहे.  धार्मिक सलोखा दुभंगला आहे आणि समाजाची मजबूत विण विस्कटत चालली आहे.  समाजामध्ये संशयाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे समाजमन अस्वस्थ, संशयग्रस्त आणि असुरक्षित वाटत आहे.  त्याचा थेट परिणाम आपल्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेवर होत आहे.


ही परिस्थिती बदलण्यासाठी युवक-युवती, विद्यार्थी, शेतकरी, प्रौढ महिला- पुरुष यांच्याशी संवाद साधण्यासाठी, समाजाला एकसंघ करण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात बंधुभाव जपत आपल्या ऐक्याचा जागर घालण्यासाठी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिजाऊ रथयात्रा 2025 अंतर्गत मराठा जोडो अभियान आयोजित करण्यात आले आहे.


रथयात्रेचे स्वागत करण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई काका, मा.नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील (भैय्या), मा.उपनगराध्यक्ष प्रकाश गावडे (पैलवान), बजरंग काळे गुरुजी, अविनाश उर्फ पांडुरंग माने, पत्रकार चंद्रकांत भाट,डॉ.अतुल पाटील, विनोद मुळीक, कृष्णा देशमुख, सचिन उर्फ शशिकांत पवार, सुनील देशमुख,गुरुदत्त देसाई, नितीश कोळी तसेच शिरोळ मधील अनेक महिला व  नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने