शिरोळ प्रतिनिधी :
शिरोळ तालुक्यात मोठया संख्येने असलेल्या दिव्यांग बांधवांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. दिव्यांग्यांचे हे प्रश्न सोडवण्याची धमक आंदोलन अंकुश संघटनेत असल्यामुळे, आज शिरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज तक्तात, तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी एकत्र येऊन "अंकुश दिव्यांग सहाय्य संस्थेची" आज स्थापना केली.
अंकुश दिव्यांग सहाय्यसंस्थेची घोषणा करताना आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे म्हणाले की, ही संस्था दिव्यांग बांधवांचे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करनार आहे. दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी आंदोलन अंकुश संघटना नेहमीच सहकार्याच्या भूमिकेत राहिलेली आहे. गेली अनेक वर्ष दिव्यांग बांधवांना येणाऱ्या अडिअडचणी सोडवण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावात असणाऱ्या लोकांना मदत करता यावी यासाठी आम्ही अंकुश दिव्यांग सहाय्य संस्था निर्माण करत आहोत.
या संस्थेच्या माध्यमातून गरजूना आर्थिक सहाय्य मिळवून देणे, त्यांना मिळणाऱ्या 5% निधित वाढ कशी होईल हे पाहणे, पेन्शन योजनेचा लाभ मिळवून देणे. तसेच घरफाळा माफी मिळवून देणे, दिव्यांगाना रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे आणि महत्वाचे म्हणजे त्यांचं जगणं सुसह्य व्हावे, म्हणून लागणारे साहित्य देणे यासाठी म्हणून ही संस्था यापुढे आंदोलन अंकुश संघटनेच्या छताखाली काम करणार आहे.
आज अधिकृतरित्या या संस्थेची घोषणा झालेली असून लवकरच शिरोळ तालुक्याची कार्यकारिणी निर्माण करून, प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. तालुक्यातील सर्वच दिव्यांग बांधवांनी या संस्थेत सहभागी होण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
आजच्या बैठकीस अनिल देशमुख, विनायक चुडमुंगे, भानुदास माने, मुकुंद काळे, सुधाकर तावदारे, संजय पाटील, संजय मेंगे, रसूल पाथरवट, सय्यद पिरजादे, महादेव तलवार, रुकाय्या किरुरे, अरगोंडा पाटील, उद्धव मगदूम, योगेश खाडे, टिल्लू जाधव यांच्या सह शिरोळ तालुक्यातील दिव्यांग बांधव उपस्थित होते.
शिरोळ तहसील वर मोर्चा :
येत्या 24 मार्च ला 5% दिव्यांग निधीच्या न्याय्य मागणीसाठी व अन्य मागाण्यांच्या पूर्ततेसाठी शिरोळ तहसील वर दिव्यांगांचा मोर्चा काढण्याचे आजच्या बैठकीत ठरवण्यात आले असून, शिरोळ तालुक्यातील सर्वच दिव्यांग बांधवानी मोठया संख्येने या मोर्चात सामील व्हावे असे आवाहन धनाजी चुडमुंगे यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा