प्रजासत्ताक दिनानिमित्त सालाबादा प्रमाणे या वर्षी देखील अटल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे कडून हसूर फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते व हसूर ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच अटल सेवाभावी संस्थेचे संस्थापक श्री.दिपक पाटील यांच्या पुढाकाराने प्रत्येक वर्षी हसूर फेस्टिवल चे आयोजन करण्यात येते. दोन दिवस असणार्या या हसूर फेस्टिवल चे स्वरूप पुढीलप्रमाणे :
दिनांक 26 जानेवारी रोजी भव्य ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा :
हसूर फेस्टिवल च्या पहिल्या दिवशी म्हणजे दिनांक 26 जानेवारी रोजी भव्य ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. यात शालेय विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर / लोकनृत्य ग्रुप रेकॉर्ड स्पर्धा घेण्यात येणार असून या स्पर्धेत महाराष्ट्रसह उत्तर कर्नाटकातील शालेय संघांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.
दिनांक 27 रोजी प्रसिद्ध व्याख्याते श्री.राहुल गिरी यांचे व्याख्यान :
महाराष्ट्रभर आपल्या व्याख्यानांसाठी प्रसिद्ध असलेले, आपल्या विशिष्ट भाषण शैलीने श्रोत्यांची मने जिंकणारे श्री. राहुल गिरी यांचे समाजप्रबोधनपर व्याख्यान सोमवार दिनांक २७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित केले आहे. शिरोळ तालुक्यात पहिल्यांदाच राहुल गिरी यांचे आगमन होणार आहे. शिरोळ तालुक्यातील सर्व श्रोत्यांनी पर्वणीच असणार्या सदर कार्यक्रमाला हजेरी जास्तीत जास्त संखेने हजेरी लावावी, अशी माहीती अटल सेवाभावी संस्थेचे संस्थापक मा. दिपक पाटील यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा