शिरोळ तालुक्यातील बेकायदेशीर माती उपसा प्रकरणात तलाठी, मंडळ अधिकारी यांना जबाबदार धरून निलंबांनाची कारवाई करावी : धनाजी चुडमुंगे

   

आंदोलन अंकुश संघटनेकडून नायब तहसिलदार यांना निवेदन    

      

शिरोळ प्रतिनिधी : मंगेश नलवडे


              बेकायदेशीर माती उपसा प्रकरणात आंदोलन अंकुश संघटनेकडून आंदोलनाचा ईशारा :

        आंदोलन अंकुश संघटने कडून शिरोळ तालुक्यात बेकायदेशीर माती उपसा होत असल्याची तक्रार वारंवार करण्यात आलेली आहे. त्यासंदर्भात लेखी पत्र देखील यापूर्वी देण्यात आलेले होते. शिरोळ तालुक्यात तहसीलकार्यालया कडून माती उपसा परवानगी दिली आहे, त्याची चौकशी करावी म्हणून त्या पत्रात मागणी केली होती. त्यानुसार कार्यालयाकडून चौकशी केली असेल व त्यामध्ये रॉयल्टी पेक्षा जादा माती उपसा केल्याचे आढळून आले असेल तर, त्याला इतरांच्या बरोबर महसूल विभागाचे गाव पातळीवरील तलाठी, मंडळ अधिकारी ही जबाबदार आहेत. कारण माती उपसा दिलेल्या अटी शर्थी पाळून सुरु आहे का...? हे दररोज पाहण्याची त्यांची जबाबदारी आहे आणि त्यांनी ती पार न पाडल्यामुळेच रॉयल्टी चुकवून उपसा झालेला असतो. त्यामुळे याला सर्वस्वी तलाठी, मंडळ अधिकारी जबाबदार आहेत. 

       शासनाने गौण खनिज बाबतीत वेळोवेळी केलेले शासन निर्णय आणि आदेश यांचा विचार करून त्यांच्या निलंबनाची कारवाई व्हावी, म्हणून वरिष्ठ कार्यालयाकडे तसा प्रस्ताव पाठवावा, त्याचबरोबर 5 फुटपेक्षा जादा माती उपसा होऊ नये हेही पाहणे महसूल विभागाची जबाबदारी आहे.

        शिरोळ तालुक्यातील आलास - कवठेगुलंद या ठिकाणी मोठया प्रमाणात माती उपसा रात्रंदिवस सुरु असून हजारो ब्रास माती दररोज काढली जात आहे आणि आपल्या भरारी पथकाला हे दिसत नाही हे न पटणारे असून, या भरारी पथकाला पण याला जबाबदार धरून कायदेशीर कारवाई व्हावी. तहसील कार्यालयाकडून याबाबतीत तात्काळ कारवाई न झाल्यास आम्हाला नाईलाजाने आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागेल. असे निवेदनात म्हंटले आहे.

आवक जावक विभागातील अधिकारी यांच्यावर कारवाई करावी: 

          वरील निवेदन नायब तहसिलदार यांना देऊन त्याची पोहोच घेण्यासाठी गेलो असता तेथील अधिकारी यांनी कार्यकर्त्यांना उद्धटपनाची उत्तरे दिली. सरळ बोला, तुम्ही काय मालक नाही असे कार्यकर्त्यांनी म्हंटले असता, आम्ही ठरवले तऱ अवघड होईल अशी अरेरावीची भाषा त्यांनी केली. याबबात तहसिलदार यांना लेखी तक्रार करणार आहोत, अशी माहिती आंदोलन अंकुश च्या कार्यकर्त्यांनी दिली.   

        यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख श्री.धनाजी चुडमुंगे,दानोळी शाखा प्रमुख दत्तात्रय जगदाळे, सामाजिक कार्यकर्ते विजय दळवी, बाळासाहेब भोगावे, भुषण गंगावने उपस्थित होते. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने