शिरोळ प्रतिनिधी : मंगेश नलावडे
स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे शिरोळ तालुका अध्यक्ष मा.खंडेराव वसंत कांबळे हे आज गुरुवार दिनांक 30/01/2025 रोजी सकाळी 11 वाजले पासून कुटवाड,ता.शिरोळ,जि.कोल्हापूर येथील विविध मागण्यांच्यासाठी बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत.
यासंदर्भात श्री.कांबळे यांनी 28/01/2025 रोजी तहसिलदार,शिरोळ यांना याबाबत निवेदन दिलेले होते. त्या निवेदनामध्ये पुढील मागण्या केल्या आहेत.
- सन 2019 च्या कुटवाड ग्रामपंचायत बॉडी मध्ये असलेल्या सरपंच व उपसरपंच तसेच सर्व सदस्यांची चौकशी व्हावी.
- मौजे कुटवाड सन 2019 ते 2021 च्या तत्कालीन ग्रामसेवीका सौ.तेजस्विनी भोसले यांची विभागीय चौकशी व्हावी.
- महापुरात अस्तित्वात नसलेल्या दुकानदारांना आणि घरी पडलेली नसताना सरकारी लाभ देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी.
- मौजे कुटवाड सन 2019 ते 2021 चे तत्कालीन गाव कामगार तलाठी प्रकाश कवडे यांची विभागीय चौकशी व्हावी.
शिरोळ चे तहसिलदार अनिलकुमार हेळकर हे या अधिकार्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप सदर निवेदनात श्री.कांबळे यांनी केला आहे व सदर बाबतीत लवकरात लवकर चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी श्री.खंडेराव कांबळे यांनी केली आहे.
यावेळी स्वाभिमानी स्वराज्य सेना संस्थापक अध्यक्ष प्रशांत भाऊ सदामते, तालुका अध्यक्ष खंडेराव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष सांबळे तसेच रोहित कांबळे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मोहन कांबळे हे उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा