प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क
कोल्हापूर - सांगली जिल्ह्यामध्ये पर राज्यातून खरेदी करण्यात आलेल्या वाहनांसाठी वेगवेगळ्या अटी व शर्ती लावलेल्या आहेत. वाहनांची एन.ओ.सी. देऊन सुद्धा स्थानिक वितरकाकडुन वाहनांचा हिस्ट्री डाटा, तसेच वाहन ज्या राज्यातून आलेले आहे, तेथील आर.टी.ओ. ऑफिसला मेल करून, त्याचे उत्तर आले पाहिजे. अशी सक्ती वाहनधारकांच्यावर केली जात आहे. अशा अन्याय कारक अटींच्यामुळे गेली वर्षभर जुन्या वाहनांच्या नोंदी रखडलेल्या होत्या.
त्याबाबतीत आंदोलन अंकुश संघटनेकडून एकदा वाहनधारकाने वाहनाची एन.ओ.सी. आणून दिल्यानंतर त्याची नोंदणी आणि जे काय पुरावे पाहिजे असतील, ते परिवहन कार्यालयाने ऑनलाईन ईमेलद्वारे मागून घ्यावेत. व त्यासाठी वाहनधारकांना वेठीस धरू नये आणि रखडलेल्या नोंदण्या तात्काळ कराव्यात, अन्यथा कार्यालयासमोर आंदोलन करू असा प्रादेशिक परिवहन कार्यालयाला इशारा देण्यात आलेला होता .
याची तात्काळ दाखल घेत प्रादेशिक परिवहन अधिकारी मा. भोर साहेब यांनी पर-राज्यातून आलेल्या वाहनांच्या नोंदी संदर्भात वाहनधारकाने वाहनाची एन.ओ.सी. दिल्यानंतर, जी काही उचित कारवाई करायची आहे, ती त्या त्या परिवहन कार्यालयाने करावी. तसेच मागील वर्षभरापासून रखडलेल्या जुन्या वाहनांच्या नोंदणी तात्काळ करावे. असे आदेशाचे पत्र कोल्हापूर - सांगली - इचलकरंजी येथील सहाय्यक प्रादेशिक परिवहन कार्यालयांना काढले आहेत. त्यामुळे रखडलेल्या वाहनांची नोंदणी कामाला वेग आलेला आहे. अशी माहिती आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी दिली .
सध्या सांगली - कोल्हापूर भागामध्ये साखर कारखान्यांचे ऊस वाहतुकीचे करार सुरू झाले आहेत. त्यामुळे या भागात शेतकऱ्यांनी आणलेल्या जुन्या ट्रॅक्टरची नोंदणी होणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे वाहनधारकांचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.
आंदोलन अंकुश संघटनेच्या या लढ्याबद्दल वाहनधारक आणि शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा