श्री.हनुमान जयंती निमित्त विजेता स्पोर्ट्स आयोजित भव्य फुल पीच क्रिकेट स्पर्धा

 




शिरोळ प्रतिनिधी : 


श्री. हनुमान जयंतीचे औचित्य साधून शिरोळ व आगर भागात स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्याचा मोठा अनुभव असलेल्या विजेता स्पोर्ट्स ने आगर शिरोळ प्रीमियर लीग 2025  भव्य फुल पीच क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले आहे.


सदर स्पर्धा ही दिनांक 12 एप्रिल 2025 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. सदर फुल पीच क्रिकेट स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष आहे. आय.पी.एल.च्या धर्तीवर सदर स्पर्धा ही लीग पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. दिनांक 5 एप्रिल 2025 पर्यंत 4000 प्रवेश फी जमा करणार्‍या सहा संघांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच ज्या खेळाडूंना स्पर्धेत भाग घ्यावयाचा आहे, त्यांनी 7 एप्रिल 2025 पर्यंत फॉर्म जमा करावेत. असे आवाहन आयोजकांच्या कडून करण्यात आले आहे. खेळाडूंची निवड ही लिलाव पद्धतीने केली जाणार आहे. खेळाडूंना 100 रुपये फॉर्म फी ठेवण्यात आलेली आहे. प्रत्येक स्पर्धकाला एक किट आयोजकांकडून देण्यात येणार आहे.


आकर्षक बक्षिसे : 

प्रथम क्रमांक 10,001 व चषक, 

द्वितीय क्रमांक 7001 व चषक, 

तृतीय क्रमांक 4001 व चषक, 

चतुर्थ क्रमांका साठी आकर्षक चषक ठेवण्यात आलेले आहे. तसेच ईतर वयक्तिक बक्षिसे देखील ठेवण्यात आलेली आहेत. 


सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संघमालक व खेळाडूंनी खालील आयोजकांची संपर्क करावा : 


 इंजि. रणजित माने :             91 56 20 54 60       

 दत्ता शिंदे ( फौजी )  :           99 60 30 42 24

 गणेश संकपाळ ( पोलीस ) :  94 21 20 43 48     

 सतीश सावंत :                       88 30 03 78 57

                                       




 





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने