शिरोळ प्रतिनिधी : मंगेश नलावडे
नवीन पाणी पुरवठा योजनेतून परस्पर नळ कनेक्शन देऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याची आंदोलन अंकुश ने तक्रार केली होती. या तक्रारी च्या अनुषंगाने प्रभारी मुख्याधिकारी यांनी पाणी पुरवठा अभियंता अमन मोमीन यांनी दिलेल्या प्राथमिक अहवालाच्या आधारे पाणी पुरवठा कर्मचारी लिपिक मल्लिकार्जुन बल्लारी आणि विनायक लोंढे दोषी आढळल्याने त्यांना निलंबित केले आहे. तसेच वरील कर्मचारी व ठेकेदाराचे कर्मचारी यांच्यावर पाणी पुरवठा अभियंता मोमीन यांना या सर्वांच्या विरोधात शिरोळ पोलिसात फिर्याद दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
आंदोलन अंकुश ने पूर्ण ताकत लावून या प्रकरणाची कड लावली : नगरपरिषद मध्ये भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नसल्याचा धनाजी चुडमुंगे यांचा इशारा.
शिरोळ मधील नवीन पाणी पुरवठा योजनेमध्ये, नवीन नळ कनेक्शन साठी नगरपरिषद मध्ये अर्ज केला तर, जास्त खर्च येईल. तसेच मागील घरपट्टी भरावी लागेल. ऑनलाइन अर्ज करावा लागेल,अशी भीती नागरिकांना घालून परस्पर 1700 रुपये घेऊन नळ कनेक्शन जोडून देण्यात आले आहे, अशी माहिती आंदोलन अंकुश ला समजताच आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चुडमुंगे, शिरोळ शहराध्यक्ष अक्षय पाटील यांनी गेले 4 दिवस सर्व पुरावे गोळा करून भ्रष्टाचार करणार्या कर्मचार्यांना निलंबित करे पर्यन्त नगरपरिषद सोडली नाही. त्याचबरोबर शिरोळ मध्ये आंदोलन अंकुश असेपर्यंत भ्रष्टाचार होऊन देणार नाही व केलेल्यांना माफ केले जाणार नाही, असा संदेश दिला.
पाणी पुरवठा इंजिनियर आणि अकाउंटंट यांच्यावर कारवाईची टांगती तलवार :
नवीन नळ कनेक्शन जोडणी प्रकरणी आर्थिक अपहार झाला. 2 लिपिक निलंबित झालेदेखील. परंतू त्या कर्मचार्यांच्या बरोबरीने त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेले पाणी पुरवठा इंजिनियर यांची देखील जबाबदारी आहे, त्यामुळे पाणी पुरवठा विभाग प्रमुख म्हणून श्री. अमन मोमीन व दोषी कर्मचार्यांनी एका दिवसात 100 ते 150 पावत्या फाडून पैसे अकाउंटंट यांचेकडे जमा केले. ते पैसे घेणारे अकाउंटंट हरी पांडू कामून हे देखील दोषी असलेला अहवाल सोमवारी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना पाठविल्याशिवाय सोमवारी करण्यात येणारे आंदोलन थांबणार नाही, असे आंदोलन अंकुश संघटनेचे शहर अध्यक्ष अक्षय पाटील यांनी माध्यमांशी बोलताना संगितले.
शिरोळच्या इतिहासातील भ्रष्टाचार प्रकरणी पहिलीच पोलीस केस :
नवीन नळ पाणी पुरवठा योजनेतून परस्पर नळ कनेक्शन देऊन नगरपरिषद ची फसवणूक केल्या प्रकरणी नगरपरिषद कर्मचारी आणि ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यावर शिरोळ पोलिसात नगरपरिषद कडून फिर्याद देण्याचे काम सुरू आहे. शिरोळ च्या इतिहासातील भ्रष्टाचारावरील ही आत्तापर्यंतची मोठी कारवाई असल्याचे धनाजी चुडमुंगे, शिरोळ शहराध्यक्ष अक्षय पाटील म्हणाले.
यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिरोळ चे नागरिक मोठ्या संखेने शिरोळ नगरपरिषद मध्ये आज उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा