जण रेट्यातून आलमट्टी च्या उंचीला रोखणार... शिरोळ तालुक्याच्या नसानसात चळवळीचं रक्त : धनाजी चुडमुंगे



टाकवडे प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क



चळवळींना बळ देणारा भाग म्हणून शिरोळ तालुक्याचे देशात नाव आहे. इथे कोणत्याही संकटांना पुरून उरण्याची उर्मी या मातीत आहे. आलमट्टी धरणाच्या रूपाने या तालुक्यावर जे महापुराचे संकट उभे राहिले आहे. या ऊंची वाढीच्या विरोधात आंदोलन अंकुश संघटनेने केंद्र सरकारला हरकती पाठविण्याची मोहीम गेल्या महिन्याभरापासून हाती घेतली आहे.  





अलमट्टी धरणाच्या उंचीला विरोध आहे, म्हणून केंद्र सरकार कडे नागरिकांच्या हरकती दाखल करण्याचे अभियान तालुक्यातील प्रत्येक पुरबाधित गावात आंदोलन अंकुश कडून राबविले जात आहे. त्यासाठी काल गुरुवार दिनांक 1 मे 2025 रोजी शिरढोण आणि टाकवडे येथे काल बैठका घेण्यात आल्या. यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे म्हणाले, अलमट्टी धरणाच्या ऊंची वाढीच्या संकटावर चळवळीच्या माध्यमातून लढा उभा करणार व जण रेट्यातुन या आलमट्टीच्या प्रस्तावित उंचीला रोखण्याचा आमचा संकल्प आहे. शिरढोण, टाकवडे ही गावे चळवळी ला बळ देणारी आहेत या गावांनी या लढ्याला साथ द्यावी.



आंदोलन अंकुश च्या या लढ्यामध्ये नागरिकांनी मोठया प्रमाणात भाग घेतल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर महापूर नियंत्रण होण्यासाठी सरकार ने कायमस्वरूपी उपाय योजना राबवल्या पाहिजेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.



या भागात लागोपाठ येत असणाऱ्या महापुरास आलमट्टी धरण कारणीभूत असल्याचे व या धरनाची आणखी उंची वाढवल्यास महापुराचा आणखी धोका वाढणार असल्याचे धनाजी चुडमुंगे यांनी यावेळी सांगून, नागरिकांनी आलमट्टीच्या प्रस्तावित उंचीला माझी हरकत असल्याचे केंद्राकडे हरकत पत्र रजिस्टर पोस्टाने पाठवावे असे आवाहनही शेवटी केले.



विश्वास बालिघाटे यांनी स्वागत केले तर शक्ती पाटील यांनी आभार मानले. यावेळी शिरढोण सरपंच भास्कर कुंभार यांनी आमच्या सर्व सदस्यांसह गावातून किमान 200 हरकती पाठवणार असे यावेळी जाहीर केले.



यावेळी आंदोलन अंकुश चे राकेश जगदाळे, दिपक पाटील, पप्पू मुंगळे, शाहीर बानदार यांच्यासह उप सरपंच शिवानंद कोरबू, अविनाश पाटील, दादू चौगुले, धन्यकुमार पाटील व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने