भगवान महावीर हे वीर , अतिवीर , सन्मति आणि वर्धमान म्हणूनही ओळखले जाणारे, जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर होते . त्यांनी जैन धर्माचे पुनरुत्थान केले. त्यांनी पूर्व-वैदिक काळातील पूर्वीच्या तीर्थंकरांच्या आध्यात्मिक, दार्शनिक आणि नैतिक शिकवणींचा विस्तार केला.
वीर सेवा दल व चंदाबाबा ग्रुप औरवाड यांच्यावतीने श्री १००८ भगवान महावीरांच्या २६२४ व्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्ताने औरवाड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मानवाने विज्ञानातील प्रगतीच्या जोरावर सर्व काही साध्य केले आहे. मात्र, रक्तनिर्मिती करता आलेली नाही. अशातच राज्यात तसेच जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये ही परिस्थिती लक्षात घेऊन मंगळवार दि.८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत श्री आदिनाथ दिगंबर जैन समाज हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून या निमित्ताने सामाजिक कार्य होत असल्याने सर्व स्तरांतून या शिबिराचे स्वागत होत आहे. श्री.आदिनाथ दिगंबर जैन समाज , वीर सेवा दल, चंदा बाबा ग्रुप औरवाड यांच्या वतीने रक्तदात्यांना प्रवासाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट अथवा स्टीलच्या पाण्याची बॉटल, तसेच सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
तरी औरवाड सह परिसरातील जास्तीतजास्त संख्येने तरुणांनी रक्तदान करावे, असे आवाहन वीर सेवा दल व चंदा बाबा ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले आहे .
टिप्पणी पोस्ट करा