शिरोळ प्रतिनिधी : मंगेश नलावडे
नगरपरिषद शिरोळ च्या अनागोंदी कारभारा विरोधात व शिरोळकर नागरिकांच्या विविध मागण्यासाठी युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी आज 4 एप्रिल गुरुवार पासून छ.शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलनास प्रारंभ केला आहे. छत्रपती शिवाजी तख्तातील छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या गादीस पुष्पहार अर्पण करून आणि प्रेरणा मंत्र म्हणून या धरणे आंदोलनाची सुरुवात झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले
शिरोळ नगर परिषदेच्या भोंगळ आणि अनागोंदी कारभारामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नागरिकांना वेळेत पाणी मिळावे, तसेच मूलभूत सुविधा तात्काळ पुरवाव्यात. अशी मागणी पालिकेकडे केली होती. मात्र पालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्या संदर्भात वरिष्ठांकडे न्याय मागितला त्यांनीही याकडे गांभीर्याने घेतले नाही. यामुळे जनतेला पाण्यासह सर्व सोयी सुविधा मिळाव्यात याकरिता यापुढेही तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभा करू. असा इशारा शिरोळचे युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी दिला.
पृथ्वीराजसिंह यादव पुढे म्हणाले की, शिरोळकर नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पण जिवनावश्यक असणारा पाणीपुरवठा हा प्रश्न गंभीर स्वरूपाचा आहे. नगरपरिषदेने तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करावा. जनतेचे रखडलेले मूलभूत प्रश्न तात्काळ सोडवावेत. अन्यथा पालिकेच्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल. असेही त्यांनी सांगितले.
उद्या नगरपरिषद कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन :
शिरोळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव हे सतत कार्यालयात गैरहजर राहत आहेत. यामुळे नागरिकांचे मूलभूत प्रश्न कोणासमोर मांडायचे असा प्रश्न जनतेला पडला आहे. कार्यालयातील अधिकारीही वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नाहीत. नागरी सुविधांचा अभाव शहरात निर्माण झाला आहे. यामुळे धरणे आंदोलनातील संतप्त नागरिकांनी उद्या शुक्रवार दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नगरपरिषद कार्यालयास टाळे ठोक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, दत्त कारखान्याचे संचालक दरगू गावडे, माजी ग्रा.प. सदस्य धनाजी पाटील नरदेकर, प्रकाश माळी, आनंदराव माने देशमुख, अविनाश उर्फ पांडुरंग माने, राहुल कट्टी, सौ हेमाताई जाधव, आप्पासाहेब गावडे, एम. एस. माने, इम्रान आत्तार, जय शेट्टी, सतीश चव्हाण, प्रकाश संकपाळ, सुनील देशमुख, शरद माळी, दिलीप कलावंत, संदीप माने, दिगंबर सकट, अनिल लोंढे, चंद्रकांत भाट, रमेश पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतामधून शिरोळ नगर परिषदेच्या कारभाराबाबत तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त करत पालिकेने नागरिकांना तात्काळ मूलभूत सुविधा पुरवाव्यात अन्यथा यापुढेही घागर मोर्चा काढणे, कार्यालयास कुलूप लावणे, रास्ता रोको अशी तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी माजी सरपंच गजानन संकपाळ, श्रीमती सुवर्णा संकपाळ, विराजसिंह यादव, शिवाजीराव चव्हाण, विजय आरगे, रावसाहेब माने, दरगू पाटील श्रीकांत माने गावडे, बाळासाहेब कोळी, कृष्णा भाट, बापूसाहेब गंगधर, प्रतीकसिंह जगदाळे, गुरुदत्त देसाई, दीपक भाट, गजानन कोळी, भगवान आवळे, भालचंद्र ठोंबरे, दिलीप संकपाळ, ओंकार गावडे,आकाराम पाटील, पुंडलिक गावडे,अमोल मोहिते, दिलीप कोळी, संतोष गावडे, अक्षय गवळी, सदाशिव गावडे, शहाजी काळे, दत्तात्रय काळे, यांच्यासह शिरोळ परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.
टिप्पणी पोस्ट करा