दानोळी - निमशिरगांव रस्त्याच्या साईड पट्टीचे नियमानुसार काम पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण : उदय होगले






दानोळी प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क



दानोळी - निमशिरगांव मजबूत रस्त्याची साईड पट्टी उकरून वारणा नदीतून तारदाळ गावाला जलवाहिनी गेली आहे. जलवाहिनी चे काम पूर्ण झाल्यावर मात्र ठेकेदाराने साईड पट्टी चे काम दर्जाहीन केले. नुसता साईडपट्टीला माती टाकून सोडून दिले. त्याचबरोबर जलवाहिनीची खुदाई करताना मोरी चे देखील नुकसान केले आहे. रोलिंग न करता फक्त माती टाकल्यामुळे रस्त्याच्या कडेला मोठे मोठे खड्डे आता पडले आहेत व त्यामुळे सदर रस्त्याला अपघाताचे प्रमाण वाढले आहे.





यासंदर्भात आंदोलन अंकुश चे जिल्हा उपाध्यक्ष उदय होगले व टीम ने सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार पत्रव्यवहार केला होता. गेले दोन महीने जल वाहीनीचे काम पुर्ण झाले आहे, पण रस्त्याच्या साईड पट्टीचे नियमानुसार काम न झाल्याचे आंदोलन अंकुश ने  सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.अनंत सुर्यवंशी यांना निकृष्ट दर्जाचे काम निदर्शनास आणून दिले. 





याची दखल घेऊन सदर निकृष्ट दर्जाच्या कामाची उपअभियंता सूर्यवंशी यांनी काल सोमवार दिनांक 28 एप्रिल रोजी पाहणी करुन संबंधित ठेकेदारकडून नियमाने काम करण्याच्या सुचना दिल्या. चांगला मुरूम, बारीक खडी टाकून, पाणी मारून रोलिंग करा. अशा सक्त सूचना त्यांनी ठेकेदाराला दिल्या आहेत. त्याचबरोबर ठेकेदाराने काम पूर्ण न केल्यास ठेकेदाराच्या अनामत रक्कमे मधून सदर काम आम्ही पूर्ण करून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले व मोरी चे नुकसान केल्याबद्दल कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.






नियमानुसार साईड पट्टीचे काम पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा आंदोलन अंकुश संघटने कडून देण्यात आला आहे.यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय दळवी, बंडू होगले, दत्तात्रय जगदाळे, बाळू भोगावे, प्रमोद बाबर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने