गुरुदत्त शुगर्सने हंगाम 2024 -25 मध्ये गळीतास आलेल्या ऊसाची प्रलंबित बिले तात्काळ वर्ग करावी : दिपक पाटील

 



सैनिक टाकळी : प्रतिनिधी


गुरदत्त साखर कारखान्याकडून गाळप हंगाम 2024- 25 मध्ये फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांमध्ये गळीतास आलेल्या उसाची बिले किसान कार्ड योजने सह शेतकऱ्यांना अद्याप वर्ग करण्यात आलेली नाहीत. 



ती एफ.आर.पी. च्या फरकासह तात्काळ वर्ग करावीत.  शुगर केन कंट्रोल ऑर्डर नुसार 14 दिवसाच्या आत एफ.आर.पी. द्यावी. अन्यथा वेळेत एफ.आर.पी. ची रक्कम न दिल्यास कलम 3(3 ए) नुसार विलंब कालावधीसाठी 15 टक्के व्याज आकारण्याची तरतूद आहे. त्याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 15 टक्के व्याज द्यावे लागेल. असा इशारा निवेदनाद्वारे आंदोलन अंकुश संघटनेकडून आज देण्यात आला. 


तसेच साखर आयुक्तलयाला हिशोब सादर करुन दुसऱ्या हप्त्याची तरतूद करावी, अन्यथा कारखान्याच्या गेट समोर आंदोलन करण्याचा इशारा आंदोलन अंकुश संघटनेकडून देण्यात आला आहे.


यावेळी गुरुदत्त शुगर्स चे सी.ओ. श्री. पवार साहेब यांनी निवेदन स्विकारुन पुढील आठवड्यात बिले काढण्याचे आश्वासनं दिले.


 यावेळी आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दिपक पाटील, सचिन वाणी ,रशिद मुल्ला, अरिहंत शिरहट्टी, अजीत कणिरे, सागर कोळी इ. शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने