शिरोळ प्रतिनिधी : मंगेश नलावडे
आंदोलन अंकुश संघटने कडून शिरोळ चे नायब तहसिलदार श्री. भिसे साहेब यांना शासनाने ठरवून दिलेल्या रक्कमे पेक्षा जास्त पैसे घेणार्या गॅस वितरकांच्यावर कारवाई करावी. या संदर्भात निवेदन देण्यात आले.
घरगुती गॅस सिलेंडर चा शासकीय दर 805 रुपये असताना, तालुक्यातील सर्व गॅस वितरक 820 पासून 850 रुपये पर्यंत मनात येतील तेवढे पैसे घेत आहेत.ऑनलाइन गॅस बूक केल्यानंतर 805 रुपयेच भरावे लागतात,परंतू सर्वांना ऑनलाइन बूकिंग करणे शक्य होत नाही. स्मार्ट फोन वापरुन गॅस बूकिंग करणे आजच्या तरुण पिढीला शक्य होईल, परंतु जेष्ठ मंडळींना अजूनही स्मार्ट फोन वापरुन गॅस बूकिंग करणे तेवढे शक्य होताना दिसत नाही.
गॅस सिलेंडर ही सध्या मूलभूत गरज असताना अमाप पैसे घेऊन तालुक्यातील गॅस वितरक सर्व सामान्य लोकांची लूट करीत आहेत. तरी वरील विषय गांभीर्याने घेऊन गॅस कंपन्याचे सेल्स ऑफिसर,तालुक्यात गॅस पुरवठा करणारे सर्व वितरक आणि पुरवठा विभाग यांची आपल्या अध्यक्षते खाली बैठक लवकरात लवकर घेऊन योग्य ती कारवाई करावी अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. या संदर्भात पुरवठा विभागाशी लगेच चर्चा करून जास्त पैसे घेणार्यांच्यावर त्वरित कारवाई करू असे आश्वासन नायब तहसिलदार भिसे साहेब यांनी संघटनेला दिले.
यावेळी टाकळीचे डॉ. राजेंद्र पाटील, कृष्णा देशमुख, चिंचवाडचे आप्पासो कदम , दत्तवाडचे अचिन हेरवाडे, मारुती नंदिवाले, भुषण गंगावने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा