यशोदीप क्लासेस शिरोळ, नृसिंहवाडी, औरवाड मधील इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा व निरोप समारंभ शिरोळ येथील शाहू वाचनालय च्या सभागृहात रविवार दि 02/02/2025 रोजी सकाळी 10 वा.आयोजित करण्यात आला होता.
गेली दोन दशके ग्रामीण भागातील शिक्षणाच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा तालुक्यातील नावाजलेला क्लास म्हणून यशोदीप क्लासेस कडे पाहिले जाते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आंदोलन अंकुश चे प्रमुख मा.श्री धनाजी चुडमुंगे व प्रमुख उपस्थिती अर्जुनवाड गावचे सुपुत्र मा.श्री महादेव गायकवाड उपस्थित होते.
यावेळी बोलताना धनाजी चूडमुंगे म्हणाले
श्री राजू काळे सर व अमोल गावडे सर यांनी शिरोळ तालुक्यात उज्वल निकालाची यशस्वी परंपरा जोपासली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील प्रगतीचा रस्ता हा शिक्षणामधूनच जातो व शिक्षणातूनच यशस्वीतेची वाटचाल सुरू होते. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी राष्ट्राप्रती प्रेम, राष्ट्रभावना सुद्धा जोपासली पाहिजे तसेच सामाजिक बांधिलकी सुद्धा जपली पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. महादेव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यातील खडतर वाटचाल तसेच नवीन तंत्रज्ञान,आपल्याकडील असलेल्या ज्ञानाचा कसा उपयोग केला जाईल हे सांगितले. तसेच डिसिप्लिन, प्रॅक्टिस,लर्निंग एटीट्यूड,आणि गोल हे छंद कसे असले पाहिजेत याचे सविस्तर मार्गदर्शन केले.
बहुसंख्य विद्यार्थ्यांनी क्लासच्या सुरुवातीपासून ते निरोपाच्या क्षणा पर्यंत क्लास संदर्भाच्या आठवणींना उजाळा दिला. यामध्ये गौरी भातमारे, अपूर्वा किनिंगे,वेदिका संकपाळ, मयुरी संकपाळ, मोक्षा मरजे,आरती पोतदार, आलिया नालबंद, रिजा जमादार, निशा आगरे गायत्री जोशी,सानिका कदम,श्रावणी मोरे, श्रेया मोरे यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
नृसिंहवाडी शाखेच्या विद्यार्थ्यांनी क्लासला इंटरॅक्टिव्ह पॅनल साठी मदत केली. तसेच गायत्री जोशी या विद्यार्थिनीने सुद्धा क्लास साठी भेटवस्तू दिली.
यानंतर क्लास मधील शिक्षक वृंद प्रा.अमोल गावडे, प्रा.राजू काळे, प्रा सौ.स्मिता पाटील, प्रा सौ.प्रियांका चौगुले, प्रा.सुनील मगदूम, प्रा.संदीप पाटील यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून लगाम न्यूज नेटवर्कचे भुषण गंगावने व सामाजिक कार्यकर्ते कृष्णात देशमुख सुद्धा उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. प्रा. चिदानंद अळोळी सर यांनी पार पाडले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीमधील खडतर प्रवास, घ्यावयाची काळजी, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास व परीक्षेच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
टिप्पणी पोस्ट करा