प्रतिनिधी : भुषण गंगावने
आज 1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी देशाचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारमन यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पात आयकर रचनेत मोठा बदल करण्यात आला आहे.
12 लाखांपर्यंतचे उत्पन्न कर मुक्त :
आता 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. यामुळे करदात्यांना आणि मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी 7 लाखा पर्यंत उत्पन्न असणार्यांना कोणताही कर भरावा लागत नव्हता. नवीन कर प्रणाली पुढील प्रमाणे :
50 लाखांपर्यंत उत्पन्न असणार्या करदात्यांना दिलासा :
12 लाखापर्यंत उत्पन्न असणार्या करदात्यांना 80 हजार रुपयांपर्यंत फायदा मिळणार आहे. 16 लाखांपर्यंत उत्पन्न असणार्या कर दात्यांना 50 हजार रूपयांपर्यन्त फायदा मिळणार आहे. 20 लाखांपर्यंत उत्पन्न असणार्या कर दात्यांना 90 हजार पर्यन्त फायदा मिळेल. 24 लाखांचे वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना 1,10,000 पर्यन्त फायदा मिळेल तसेच 50 लाखांपर्यंत कमावणारे करदाते 1,10,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतील. यामुळे साधारण 1 लाख कोटीचा तोटा सरकारी तिजोरी ला होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा