बाल शिवाजी मंडळ,शिरोळ च्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन….

 





विशेष प्रतिनिधी : कृष्णा देशमुख

      

      शिरोळ येथील बाल शिवाजी मंडळ, राजवाडा यांच्या वतीने व कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने शुक्रवार दि. 7 फेब्रुवारी ते रविवार 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत 35 किलो व 70 किलो वजनी गट अशा भव्य कब्बडी स्पर्धा होणार आहेत. 

      

     या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत संघ सहभागी होणार असल्यामुळे, जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना नक्कीच प्रोत्साहन मिळणार आहे. आजपर्यंत बाल शिवाजी मंडळाने मोठ-मोठ्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन केलं आहे. यंदाही बाल शिवाजी मंडळाच्या क्रीडांगणावर नेटके नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी मंडळाचे सर्व जेष्ठ खेळाडू, सर्व सदस्य व खेळाडू परिश्रम घेत आहेत. 


बक्षिसांची खैरात…


      या स्पर्धेमध्ये सर्व विजेत्या संघांना जवळपास 2 लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच वैयक्तिक बक्षिसांमध्ये स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूस सायकल, उत्कृष्ट चढाई करणाऱ्या खेळाडूस LED T.V, उत्कृष्ट पकड करणाऱ्या खेळाडूस सुध्दा LED T. V व मॅन ऑफ द डे खेळाडूस आकर्षक भेटवस्तू मिळणार आहे.








प्रो कबड्डी मधील खेळाडूंची उपस्थिती…

    

      प्रो कबड्डी मूळे कबड्डी खेळाला उच्च दर्जा मिळाला आहे. कबड्डी खेळास जगात प्रसिद्धी मिळू लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रो कबड्डी मध्ये खेळलेले काही दिग्गज खेळाडू या स्पर्धेसाठी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्यामुळे, क्रीडाप्रेमींना फक्त टी.व्ही. वर बघायला मिळणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंची प्रत्यक्षात भेट होणार आहे…





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने