'चूक भूल द्यावी घ्यावी' शिरोळ नगरपरिषदेच्या कर मागणी बिलाची सर्वत्र चर्चा....



शिरोळ प्रतिनिधी : 


     
'चूक भूल द्यावी घ्यावी' या वाक्यांशाचा अर्थ असा होतो की, एखाद्या चुकीमुळे झालेल्या नुकसानीला दोन्ही पक्षांमध्ये विभागून घेतले जाते.' 

असेच वाक्य शिरोळ नगरपरिषदेने आपल्या कर मागणी बिलात घातले आहे. म्हणजेच नगरपरिषदे कडून कर मागणीच्या बिलात एखादी चूक झाल्यास दोन्ही पक्षांमध्ये ती चूक विभागून घेतली जाईल असा अर्थ त्याचा होतो.
 

उदा. एखाद्या मालमत्तेचा कर 1000 रुपये आहे. परंतू नगर परिषदेने चूकन 10 हजार रुपयांची मागणी कर मागणी बिलात केल्यास 5000 रुपये नगरपरिषद व 5000 मालमत्तेच्या मालकाने भरावे. असा अर्थ या वाक्याचा होतो का....? त्याचप्रमाणे एखाद्या मालमत्ता धारकाचे नावचं नगर परिषदेकडून चुकून बदलले गेल्यास, तरीसुद्धा नगरपरिषदेची चूक भूल माफ करावी का...?

आणि अशा प्रकारची चूक श्री. लक्ष्मी प्रसन्न झाल्याने संबंधित अधिकाऱ्याकडून झाल्यासचं त्याला जबाबदार धरणार...? काय चूक भूल झाली म्हणून माफ करणार... याचे उत्तर शिरोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी द्यावे. अशी मागणी शिरोळ चे सुजान नागरिक करत आहेत.

नगर परिषदेच्या चूक भूलीचा फटका अनेक नागरिकांना बसला आहे...
     
शिरोळ मधील नागरिक प्रवीण नामदेव माने यांची माने गल्ली, शिरोळ येथे मोकळी जागा व 220 स्क्वेअर फुटांमध्ये पत्र्याचे शेड बऱ्याच वर्षापासून आहे. परंतु नगर परिषदेमध्ये त्या शेडची आर.सी.सी. पद्धतीचे घर तळ मजला (15*17) व आर.सी.सी. पद्धतीचे घर पहिला मजला (15*17) अशी नोंद असून,आर.सी.सी. इमारतीचा कर त्यांना बऱ्याच वर्षापासून येतो. संबंधित मालमत्ता धारक 2022 पासून याचा पाठपुरावा करीत होते. 

त्यांनी नगरपरिषदेला बऱ्याचदा अर्ज केले, माहिती अधिकारात नगरपरिषदेकडे माहिती मागितली. तरीसुद्धा नगरपरिषदेकडून कोणतेही उत्तर त्यांना मिळाले नाही. म्हणून त्यांनी दुसरे अपील राज्य माहिती आयुक्तसो पुणे यांना केले.   यावर्षीपासून त्यांना संबंधित पत्रा शेडचा कर येतो. परंतु नगरापरिषदेच्या चुकीमुळे पडलेला जुना आर.सी.सी. इमारतीचा कर भरावाच, अशी नोटीस त्यांना येत आहे. पण नसलेल्याच आर.सी.सी. इमारतीचा कर भरायचा कश्यासाठी...?  

अनेक नागरिकांना कर भरून देखील पावती दिली गेली नसल्यामुळे, पुन्हा कराची मागणी होत आहे.

अश्याप्रकारच्या अनेक समस्या शिरोळ मधील नागरिकांच्या करा संदर्भात आहेत. त्यामुळे नगरपरिषदेने चूक भूल द्यावी घ्यावी हे वाक्य कर मागणी बिलात का वापरले आहे. हे सर्व सामान्य नागरिकांना आता लक्ष्यात येत आहे.
     

यासादर्भात मुख्याधिकारी श्री. प्रचंडराव साहेब यांच्याशी बोललो असता, सदर वाक्य सॉफ्टवेअर मध्येच आहे व ते संपूर्ण महाराष्ट्रात आहे, असे उत्तर साहेबांच्याकडून आले आहे. 

असे असल्यास लवकरच जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांना यासंदर्भात विचारना केली जाणार आहे.
      

           चूक भूल द्यावी घ्यावी 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने