शिरोळ प्रतिनिधी :
आरोपी लोकसेवक पूर्वी शिरोळ तहसील कार्यालयात पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत असलेला व सध्या मंडळ अधिकारी म्हणून कोडोली ता. पन्हाळा, जि.कोल्हापूर येथे कार्यरत असलेला अरुण भानुदास माळगे, वय.वर्षे 49 व दोन खाजगी इसम (1. योगेश यशवंत गावडे, वय 29 वर्षे रा. शिनगारे गल्ली, कोडोली ता.पन्हाळा जि.कोल्हापूर 2. सुशांत सुभाष चौगुले, वय 30 वर्ष रा.शहापूर, ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर ) यांना अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर ने सापळा रचून अटक केली. याबाबतचा सविस्तर वृत्तांत खालील प्रमाणे..
तक्रारदार यांचे वडिलांचे नावे कोडोली तालुका पन्हाळा येथे असलेल्या शेत जमिनीतील 10 गुंठे शेतजमीन ही तक्रारदार यांचे आईचे नावे बक्षीस पत्राद्वारे केली होती. सदर बक्षीस पत्र हे पन्हाळा रजिस्टर कार्यालय येथे दि. 10.1.2025 रोजी केले होते दि. 11.2.2025 रोजी तक्रारदार यांच्याकडे योगेश गावडे(खाजगी इसम)हे आले व त्यांनी ते सर्कल अरुण माळगे यांच्याकडे काम करत असल्याचे सांगून तक्रारदार यांना तुमचे गट नंबर 1375 ची बक्षीस पत्राची नोंद घालण्याकरता चे काम आमचे कार्यालयांमध्ये आल्याचे सांगून त्याकरिता 2500 रुपये हे सर्कल माळगे व मला द्यावे लागतील, असे म्हणून तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केली होती. म्हणून तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे तक्रार दिली होती.
तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे दिलेल्या तक्रार अर्जाप्रमाणे पडताळणी केली असता पडताळणी मध्ये आरोपी क्रमांक 2 गावडे याने मंडळ अधिकारी माळगे व स्वतःसाठी 2500 रुपयांची मागणी करून तडजोडी अंतिम 2000 रुपये लाचेची मागणी केली. तसेच आरोपी क्रमांक 3 चौगुले व आरोपी क्रमांक 1 माळगे यांनी आरोपी क्रमांक 2 गावडे यांनी मागणी केलेल्या लाचेस दुजोरा दिला. तसेच तक्रारदारास आरोपी क्रमांक 1 माळगे यांनी आरोपी क्रमांक 2 गावडे यांच्याकडे लाच रक्कम देणेस प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर सापळा कारवाई आयोजित केली असता पंच साक्षीदारांचे समक्ष तक्रारदार यांचेकडून आरोपी क्रमांक 2 योगेश यशवंत गावडे यांनी मागणी केले प्रमाणे 2000 रुपये स्वीकारलेने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सदरबाबत लोकसेवक आरोपी माळगे व इतर दोन खाजगी इसम यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सदरची कारवाई श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त / पोलीस अधीक्षक अँटीकरप्शन ब्युरो, पुणे. श्रीमती डॉ. शितल जानवे, पोलीस अधीक्षक अँटीकरप्शन ब्युरो, पुणे. श्री. विजय चौधरी, अपर पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो, पुणे. यांचे मार्गदर्शनानुसार तसेच वैष्णवी पाटील, पोलीस उपाधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली श्री. बापू साळुंखे, पोलीस निरीक्षक. पो.हे.कॉ. श्री. सुनील घोसाळकर. पो.ना. सचिन पाटील, पो.कॉ.संदीप पवार, चा.स. फौ.गजानन कुराडे अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर यांनी केले आहे.
तरी लाचेच्या अथवा अपसंपदेबाबतच्या काही तक्रारी असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करावा. असे आवाहन विभागामार्फत सर्व नागरिकांना करण्यात आले आहे. नागरिकांनी देखील अश्याचप्रकारे जागृकता दाखवून तक्रारी करणे गरजेचे आहे.
बलाढ्य पगार असताना वेळोवेळी अधिकारी लाच घेताना सापडत असतात. तरीसुद्धा लाच घ्यायची प्रकरणे काय कमी होताना दिसत नाहीत. यावर शासनाने काहीतरी ठोस उपाय करणे गरजेचे आहे.
थोड्याच दिवसात शिरोळ तहसील कार्यालयातील अधिकार्यांची तक्रार होणार असल्याचे समजले आहे.
टिप्पणी पोस्ट करा