शिरोळ प्रतिनिधी / लगाम न्यूज :
शेतकऱ्याला ऊस पिकवण्यापेक्षा ऊस घालवणे खूप अवघड होऊन बसले आहे असे मत सर्वसामान्य शेतकऱ्याचे होऊ लागले आहे. खुशाली एन्ट्री च्या नावाखाली पैसे उकळणे अशी नवीन प्रथा महाराष्ट्र कर्नाटकात आता पडू लागली आहे.
शिरोळ तालुक्यात शेतकऱ्यांच्या पाठीशी आंदोलन अंकुश संघटना...
खुशाली एन्ट्री चा पायंडा बंद पाडण्यासाठी चंग बांधलेले आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चुडमुंगे व साखर सहसंचालक कोल्हापूर यांच्या पुढाकाराने काही दिवसांपूर्वी नवीन खुशाली एन्ट्री विरोधी व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला होता. आंदोलन अंकुश कडे तक्रार घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची दखल सदर ग्रुप वर घेण्यात येत असून ज्या ज्या शेतकऱ्यांकडून इंट्री खुशालीच्या नावाखाली पैसे उकळले गेले होते त्या शेतकऱ्यांना पैसे परत मिळू लागले आहेत. यामध्ये शिरोळच्या शेतकऱ्याचे 8000... शिरदवाडच्या शेतकऱ्याचे 2500 व अकीवाटच्या शेतकऱ्याचे 2000 रुपये परत मिळालेले आहेत.
शेतकऱ्यांनी पुढे येऊन आंदोलन अंकुश कडे तक्रार करण्याची गरज...
एन्ट्री खुशाली च्या नावाखाली पैसे उकळण्याची प्रथा आपल्या भागात पाडू द्यायची नसेल आणि मजूर, मशीन मालक आणि वाहतूकदार यांच्या खंडणी ला बळी पडायचे नसेल तर शेतकऱ्यांनी आत्ताच विरोध करून आंदोलन अंकुश कडे तक्रार करण्याची गरज आहे. आंदोलन अंकुश कडे तक्रार करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मागे खंबीरपणे उभा राहून, त्यांचे पैसे परत मिळवून देईल. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पुढे येऊन खुशाली एंट्रीला विरोध करावा व ज्यांनी पैसे दिले असतील त्यांनी आंदोलन अंकुश कडे तक्रार करावी त्यांचे पैसे परत मिळतील असे आश्वासन आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी दिले आहे.
टिप्पणी पोस्ट करा