26 जानेवारी 2025 स्वतंत्र भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन...

     

      प्रतिनिधी : भुषण गंगावने

       

      भारताला ब्रिटिश राजवटी पासून 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. पण हे स्वातंत्र्य मिळवण्याचा इतिहास खूप संघर्ष पूर्ण राहिला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. 

      तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापन केली गेली व बरेचसे विचारविमर्श व सुधारणा केल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारी रोजी साजरा करण्यात येऊ लागला.


प्रजासत्ताक दिनाचे महत्व :

     प्रजासत्ताक दिन म्हणजे देशातील लोकशाहीचा विजयाचा दिवस म्हणून याकडे पाहिले जाते. लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य.

     26 जानेवारी या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार मिळाला. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश अशी भारताची ख्याती आहे. विविध भाषा, विविध धर्म वेगवेगळ्या संस्कृती, तसेच वेगवेगळ्या प्रथा भारतात आहेत. तरीही भारतातील लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. राष्ट्रीय एकता देशात टिकून आहे. प्रजासत्ताक दिन हा सर्व भारतीयांसाठी एकत्र येण्याचा आणि राष्ट्राचा अभिमान बाळगण्याचा दिवस आहे.

भारत खरोखरच प्रजासत्ताक आहे का...?

       जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतीय नागरिकांना आपल्या नागरिक म्हणून असलेल्या कर्तव्यांची जाणीव आहे का...? आणि जाणीव असूनही किती लोक त्याचे पालन करतात...? संविधानाने सांगितलेल्या भारतीय नागरिकाच्या व्याख्येत आपण खरोखर बसलो आहोत का...? ही सध्या प्रत्येक भारतीय नागरिकांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे... आपल्याला फक्त हक्क हवेत, कर्तव्य नकोत. आपण अत्यंत संकुचित आहोत, अल्पसंंतुष्ट आहोत.  आपणाला आपल्यापूर्ती सुरक्षितता हवी असते, मग इतरांचे काहीही होवो. सर्व भारतीय माझे बांधव आहेत हे आपण सोयीस्करपणे विसरतो आहोत. म्हणून संविधानाने भारतीय नागरिकांना मिळणारे मूलभूत हक्क म्हणजे :

  • समानतेचा अधिकार 
  • अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा 
  • अधिकार शोषणाविरुद्धचा अधिकार  
  • धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार 
  • शैक्षणिक अधिकार 
  • घटनात्मक उपायांचा अधिकार   

     हे अधिकार वापरणारा व्यक्तीच भारताचा नागरिक म्हणून घेण्यास पात्र आहे आणि तेंव्हाच भारत देश खरा प्रजासत्ताक होईल. 


1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने