
प्रतिनिधी : भुषण गंगावने
2005 सालापासून समाजासाठी झटणारी आंदोलन अंकुश संघटना व संघटनेचे प्रमुख श्री.धनाजी चुडमुंगे हे 2017 पासून शेतकर्यांच्या विविध प्रश्नांसाठी झटत आहेत. ऊस उत्पादक शेतकर्यांचा आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
आंदोलन अंकुश संघटनेच्या पाठपुराव्याने व प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्या पुढाकाराने खुशाली एंट्री विरोधी व्हाट्सअप ग्रुप करण्यात आलेला असून, बर्याच शेतकर्यांनी आंदोलन अंकुश कडे तक्रारी केल्यावर त्यांचे खुशाली एंट्री चे घेतलेले पैसे परत मिळू लागले आहेत.
अजुनही कोण पैसे मागत असल्यास न घाबरता आंदोलन अंकुश संघटनेशी संपर्क करावा, संघटना त्या शेतकर्यांच्या मागे कायम उभी राहील असे आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे आणि आवाहन केले आहे. पुढे ते म्हणाले उसाची शेती करणारा शेतकरी हा काही वर्षापूर्वी पर्यंत बागायतदार म्हणून ओळखला जायचा. आज हाच बागायतदार असलेला ऊस उत्पादक शेतकरी या व्यवस्थेला शरण जाऊन असहाय्य बनला असून आज त्याला कारखानदारांच्या बरोबरच ऊस तोड मजूर, ऊस वाहतूकदार व मशीन मालक इंट्री खुशाली च्या रूपाने त्याचे लचके तोडायच्या प्रयत्नात आहेत.
ऊस पिकवणे सध्या काहीसं सोपं, पण कारखाण्याला ऊस घालवन या खंडणी खोरांनी अवघड करून ठेवलं आहे. कारखानदार असेल किंवा कारखाण्याचा अधिकारी असेल प्रत्येक जण शेतकऱ्यांना ऊस तोड यंत्रणा नाही म्हणून त्याच्या मनात भीती निर्माण करतात पण जर तुम्ही प्रत्यक्ष कारखाण्याच्या ऊस अड्यात गेलात तर अड्डा फुल्ल असतो आणि सहज वाहतूकदाराला विचारला तर तो सांगेल की 48 तासा नंतरच वाहन मोकळे होते.
कारखान्याचे अधिकारी म्हणतात तसं जर खरोखर ऊस तोडायची यंत्रणा कमी असेल तर मग अड्डा रिकामा दिसायला पाहिजे किंवा वाहने लगेच खाली व्हायला पाहिजेत. पण अड्डा जाम आहे. दोन दिवसांनी वाहन रिकामं होतंय. याचा अर्थ स्पष्ट आहे
कारखान्यांची यंत्रणा फुल्ल आहे. पण शेतकऱ्यांनी मागेल तेव्हडी इंट्री खुशाली द्यावी, म्हणून त्याला यंत्रणा नाही म्हणून खोटंच सांगितले जात आहे. प्रत्येक कारखान्याकडे त्याला आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त यंत्रणा त्यांच्याकडे उपलब्ध आहे. मजूर काही प्रमाणात कमी असले तरी, ऊस तोड मशीन जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत. बहुसंख्य मशीन मालक हे कारखान्याचे अधिकारी कर्मचारीच आहेत आणि त्यामुळेच प्रत्येक कारखान्याला आवश्यकते पेक्षा जास्त ऊस पुरवठा जास्त आहे.
एकूण सर्वांचा सारासार विचार केल्यास ऊस जाईल की नाही या भीती पोटी ऊस तोडण्यासाठी शेतकरी घाई करतोय आणि त्याचा फटका म्हणून त्याला इंट्री खुशाली द्यावी लागत आहे हेच सत्य आहे.
क्रमपाळी नुसार तोड घ्यायची आणि कोणाचे लाड करायचे नाहीत, असं सगळ्यांनी ठरवले तर एका दिवसात ही सगळी व्यवस्था नीट होऊ शकते. गरज आहे ती शेतकऱ्याने थोडा धीर धरायची.आणि वेळ पडली तर थोडा संघर्ष करायची.
हंगामाच्या सुरुवातीला आपण शेतकऱ्यांनी परवडणारा दर जाहीर करेपर्यंत धीर धरता आला नाही, म्हणून उसाला टणाला 300 रुपये कमी दर घ्यावा लागला. आता ऊस घालवायला गडबड करून आधीच कमीत कमी मिळालेल्या दरातील टणाला आणखी 100 ते 200 रुपये इंट्री खुशाली साठी दिले तर शेतकऱ्यांना 15 महिने राबून पदरात किती पडनार आहेत. म्हणून सर्वच शेतकऱ्यांना विनंती आहे
ऊस एकदम कमी आहे. ऊस तोड यंत्रणा पुरेशी आहे.
तुमचा ऊस वेळेत तोडायची कारखाण्याची कायदेशीर जबाबदारी आहे.
त्यामुळे कोणतीही घाई न करता थोडा धीर धरा. तुमचा ऊस हा त्यांना तोडून न्यावाच लागणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा