दत्तवाड येथे लिंगायत प्रीमियर लीग 2025 उत्साहात संपन्न



दत्तवाड प्रतिनिधी : अचिन हेरवाडे 


दत्तवाड येथे 7 मार्च 2025 ते 10 मार्च 2025 या कालावधीत लिंगायत प्रीमियर लीग 2025 क्रिकेट स्पर्धेचे भव्य स्वरूपात आयोजन केले गेले होते. सदर स्पर्धेचे आयोजन लिंगायत समाज दत्तवाड यांचेकडून दरवर्षी केली जाते. सदर स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते. या क्रिकेट स्पर्धेत आठ मालकांच्या टीम सहभागी झाल्या होत्या. तसेच लेजंड LPL... म्हणजे 40 वर्षा पुढील स्पर्धकांच्या दोन टीम करण्यात आल्या होत्या. 


विराट वॉरियर्स विजयी : 


लीग पद्धतीने खेळवल्या गेलेल्या या क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामना विराट वॉरियर्स विरुद्ध विकी फोटोग्राफी यांच्यात रंगला. यामध्ये विराट वॉरियर्सने बाजी मारली. तसेच लेजंड एलपीएल मध्ये ए. बी. पाटील किराणा स्टोअर या संघाने  बाजी मारली. 


सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी ,लिंगायत प्रीमियर लीग सांगली, तसेच लिंगायत प्रिमियर लिग कोल्हापूर यांनी देखील मदत करून आपले योगदान दिले.समाजातील देणगीदार, लिंगायत समाज दतवाड याचे सहकार्य लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने