आंदोलन अंकुश संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी सैनिक टाकळीचे दिपक पाटील यांची तर, टाकवडे गावचे नागेश काळे यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड : धनाजी चुडमुंगे




शिरोळ प्रतिनिधी : 


क्रांतिकारी विचारांच्या आंदोलन अंकुश संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची काल शेतकरी वजन काट्यावर बैठक पार पडली. त्यामध्ये दिपक पाटील ( सैनिक टाकळी ) यांना जिल्हाध्यक्ष म्हणून  बढती देण्यात येत असल्याचे व नागेश काळे ( टाकवडे ) यांची शिरोळ तालुकाध्यक्ष म्हणून निवड करत असल्याचे राकेश जगदाळे यांनी घोषित केले.बैठकीच्या अध्यक्षपदी आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चुडमुंगे होते.


1 जून रोजी होत असलेल्या पूर परिषदेच्या नियोजनासाठी आणि आंदोलन अंकुश संघटनेचा कोल्हापूर जिल्ह्यात विस्तार वाढवण्यासाठी काल तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक शेतकरी वजन काट्यावर आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये आंदोलन अंकुश चा आक्रमक चेहरा असलेले दिपक पाटील यांची जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना बढती देण्यात आली तर शिरोळ तालुक्याची धुरा टाकवडे ग्रामपंचायत सदस्य व मराठा समाजाचे काम करणारे धडाडीचे कार्यकर्ते नागेश काळे यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या दोघांचा सत्कार जेष्ठ सहकारी सदाभाऊ महात्मे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


निवडीनंतर बोलताना धनाजी चुडमुंगे म्हणाले की दिपक पाटील यांनी आता जोमाने काम करून जिल्हाभर आंदोलन अंकुश च्या तालुकानिहाय कार्यकारिणी तयार करून, लढाऊ कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार करावी तसेच नवीन तालुका अध्यक्ष नागेश काळे यांनीही शिरोळ तालुक्यात आणखी कार्यकर्ते जोडण्यासाठी आपल्या पदाचा वापर करावा आणि पुढच्या वर्षीचे ऊस आंदोलन यशस्वी करावे अशा शुभेच्छा दिल्या.



यावेळी संजय चौगुले, धनाजी माने,गावडे सर, पिंटू ढेकळे, धनंजय जगनाडे, निबाळकर सरकार, बंडू होगले, प्रमोद बाबर, अचिन हेरवाडे, अविनाश लाड, उद्धव मगदूम, रमेश पाटील, विकास शेषवरे, कामिलबाबा इनामदार, शिवाजी काळे, अनिल हरळीकर, पप्पू मुंगळे, रशीद मुल्ला, महेश जाधव, प्रवीण माने, महादेव काळे व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने