शिरोळ प्रतिनिधी :
जगातील पहिल्या महिला महाजगद्गुरु लिं.डॉ. माता महादेवी (माताजी) मठाधिपती कुडलसंगम व महिला दिनाचे औचित्य साधून जगद्गुरु अल्लम प्रभू योगपीठ व शिरोळ लिंगायत समाज यांच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रातील कर्तुत्वान महिलांचा कल्लेश्वर मंदीर, शिरोळ येथे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाअध्यक्ष श्री मनोज कुमार रणदिवे सर यांनी माता महादेवी यांच्या कार्याचा आढावा व त्यांची जयंती साजरी करण्याचा हेतू याबद्दल मार्गदर्शन केले.
श्री. रणदिवे सर म्हणाले डॉ.माता महादेवीजी यांनी संपूर्ण आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केले. त्यांचे कार्य आजही समाजासाठी मार्गदर्शक ठरत आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार आणि त्यांचे योगदान लोकापर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. त्यांनी दिलेल्या शिकवणीमुळे समाज अधिक समतेकडे, विवेकाकडे आणि बंधुत्वाच्या दिशेने वाटचाल करत राहील. समाजाच्या धार्मिक आणि समाजासाठी उन्नतीसाठी मठांची स्थापना करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
डॉ. माता महादेवीजी यांचा जन्म 13 मार्च 1946 रोजी झाला. समाजासाठी योगदान देत 14 मार्च 2019 रोजी त्यांनी आपले देह कार्य संपवले. परंतु त्यांचे विचार आणि योगदान आजही अनेकांना प्रेरणा देणारे ठरले आहे. यासह समाजातील महिलांच्या कार्याची दखल घेऊन महिलांना प्रेरणा देणे, समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा सन्मान करणे, त्यांच्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने या विशेष पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
पुरस्कार प्राप्त महिला :
1) सौ.सुनीता बाळासाहेब गंगावने ( आदर्श माता )
2) सौ.मनीषा विजय माळी (आदर्श आरोग्य दूत )
3) सौ.पद्मावती सुरेश फल्ले( आदर्श माता)
4) सौ.ज्योती मनोहर फल्ले ( LIC प्रतिनिधी )
5) सौ. शरयू चिदानंद कांबळे (आदर्श अंगणवाडी शिक्षिका )
6) सौ. सुवर्णा श्रीनिवास रिसवडे (आदर्श माता )
7) सौ. सुशीला चंद्रकांत माळी ( आदर्श माता )
8) सौ. संध्या शैलेंद्र गावडे (आदर्श पत्रकार )
9) सौ. मनीषा नितीनकुमार कुंभार ( आदर्श अबॅकस शिक्षिका )
सदर कार्यक्रमासाठी देश विदेशासह महाराष्ट्रातील हजारो गावात लिंगायत धर्माचा प्रचार प्रसार करणारे पु.श्री. जगद्गुरु बसवकुमार स्वामीजी (पिठाध्यक्ष : जगद्गुरु अलम प्रभू योगपीठ, आळते, जि.कोल्हापूर. ) पु. श्री. जगद्गुरु प्रभूलिंग स्वामीजी (बसवपीठ : बेंगलोर ) पु.श्री. सद्गुरु अनिमिशानंद स्वामीजी (बसवमंटप,हैदराबाद ) पु.श्री. सद्गुरु विजयांबिका माताजी (बसवमंडप, चित्रदुर्ग) आदी स्वामीजी व शिरोळ परीसरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर यांच्या उपस्थितीत या पुरस्कारसोहळ्याचे वितरण पार पडले.
सदर कार्यक्रमाचे स्वागत राजू शेनवाडे, शेडशाळ व आभार स्वप्निल प्रकाश माळी, शिरोळ यांनी मानले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त लिंगायत समाज शिरोळ अध्यक्ष, उपाध्यक्ष,सर्व सदस्य, युवक मंडळे यांचे मोलाचे योगदान लाभले.
टिप्पणी पोस्ट करा